Marathi News> मनोरंजन
Advertisement

दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक

रवी जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर... वयाच्या 74 व्या वर्षी आईने घेतला आखेरचा श्वास  

दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक

मुंबई :  मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता यांच्या आईचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाने जाधव कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. आईच्या निधनानंतर जाधव कुटुंबात मोठी पोकळी तयार झाली आहे.  रवी जाधव यांची आई शुभांगीनी जाधव असं आहे.  सतत चेहऱ्यावर स्मितहास्य असणारे दिग्दर्शक रवी जाधव आईच्या निधनानंतर दुःखी आहेत. 

रवी जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट  करत आईच्या निधनाची बातमी दिली आहे. आईचा फोटो पोस्ट करत रवी जाधव म्हणाले, 'आई… १९ जुलै १९४८ – २७ मे २०२२' ,  सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रवी जाधव यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताचं , अनेकांनी त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे. तर चाहत्यांसोबतचं इंडस्ट्रीतील अनेकांनी जाधव कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read More