Marathi News> मनोरंजन
Advertisement

'...एक दो और करो', सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया

Raveena Tandon Kisses Kapil Sharma Video: कपिल शर्माचा कॉमेडी शो (Kapil Sharma) सध्या नव्या रूपात आणि ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा या शोचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी व्हिडीओत रविना टंडन चक्क (Raveena Tandon) कपिल शर्माला किस करताना दिसते आहे. 

'...एक दो और करो', सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया

Raveena Tandon Kisses Kapil Sharma: 'द कपिल शर्मा' हा शो काही महिन्यांपुर्वी नव्या रूपात आणि नव्या ढंगात आलेला आहे. या शोमध्ये रविना टंडन, सुधा मुर्ती आणि गुनीत मोंगा यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये अनेक गंमतीजमती या घडत असतात. त्यातून या शोचे अनेक व्हिडीओही व्हायरल (Raveena Tandon Viral Video) होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये कपिल शर्माला चक्क रविना टंडन किस करते आणि लाजत कपिल शर्मा जे काही म्हणतो ते ऐकून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी कपिल शर्मा आलेल्या पाहुण्यांसोबत खास गप्पा मारताना दिसतो आहे. याचा एक प्रोमो सध्या सगळीकडेच (Kapil Sharma Video) व्हायरल झाला आहे. (Raveena tandon kisses kapil sharma after roasting him video goes viral)

रविना टंडनचा आगळावेगळा अवतार 

यावेळी रविना तंडन आपल्या अंदाज अपना अपना या चित्रपटाबद्दल प्रोमोत बोलताना दिसते आहे. इन्टाग्रामवरून 'द कपिल शर्मा'च्या (The Kapil Sharma Show) शोचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यावेळी या प्रोमोत रविना टंडन म्हणते की, ''अंदाज अपना अपना या चित्रपटाच्या वेळी माझे केस हे अत्यंत कुरळे आणि छान होते मी आता माझ्या केसांची स्टाईल अशी का बरं ठेवली हेच मला समजतं नाही. आज मी जेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करते तेव्हा वाटतं यार...''

हेही वाचा - Adipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं

त्यावरच कपिल शर्मा (Kapil Sharma News) तिला अडवतो आणि म्हणतो की, ''मला असं वाटतं की लोकांनाही हेच वाटतं आपले जुने फोटोज पाहिल्यानंतर आपण परत असेच दिसावं''. यावर रविना त्याला रिप्लाय देते आणि म्हणते की, ''तुला आपले आत्ताचे फोटोज पाहूनही हेच स्वत:बद्दल वाटत असेल नाही?.'' कपिल शर्माला रोस्ट केल्यानंतर रविना आपल्या जागेवरून उठते आणि कपिल शर्माच्या जवळ जाते. त्याला जवळ घेते आणि त्याच्या गालाभोवती किस करते. त्याचवेळी कपिल लाजतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कपिलची भन्नाट प्रतिक्रिया 

रविनानं किस (Raveena Tandon Roasts Kapil Sharma) केल्यानंतर कपिल म्हणतो की, ''अशी बेईज्जत केल्यानंतर हे मिळणार असेल तर एक-दोन अजून द्या!'' असं तो म्हणतो. यावेळी रविना टंडनसह ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा आणि सुधा मुर्ती यांनी (Sudha Murthy in Kapil Sharma Show) उपस्थित होत्या. यावेळी सुधा मुर्ती यांनीही आपल्या काही जुन्या आठवणीही शेअर केल्या आहेत. सध्या या व्हिडीओवर नानातऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यामुळे व्हिडीओ चर्चचा विषय ठरला आहे.   

Read More