Marathi News> मनोरंजन
Advertisement

'जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्...', रणवीर सिंगची 'बोल्ड' जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या आपल्या एका बोल्ड जाहिरीतीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीमधून पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. या जाहिरातीत रणवीरसह अॅडल्ट फिल्म अभिनेता जॉनी सिन्स (Johnny Sins) दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   

'जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्...', रणवीर सिंगची 'बोल्ड' जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा चित्रपट असोत किंवा कपडे असोत, नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतो. एकदा तर त्याने थेट न्यूड फोटोशूट केल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान पुन्हा एकदा रणवीरने आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. रणवीर सिंग सध्या आपल्या एका बोल्ड जाहिरीतीमुळे चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्यासह या जाहिरातीत अॅडल्ट फिल्म अभिनेता जॉनी सिन्स (Johnny Sins) झळकला आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना विश्वास बसत नसून, जाहिरात तुफान व्हायरल झाली आहे. या जाहिरातीमधून पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. 

देशातील पहिल्या क्रमांकाचा सेक्सुअल हेल्थ अँड वेलनेस ब्रँड बोल्ड केअरने आपली खास मोहीम #TakeBoldCareOfHer च्या लाँचिगची घोषणा केली आहे. रणवीर सिंह सह-संस्थापक म्हणून त्यांच्याशी जोडला गेला आहे. रणवीर गेल्या वर्षभरापासून ब्रँडसह काम करत असून या मोहिमेअंतर्गत पुरुषांची लैंगिक समस्या ही सामान्य बाब असून त्यावर चर्चा केली जावी असा प्रयत्न आहे. याचसाठी त्यांनी एक जाहिरात शूट केली असून यामध्ये टीव्हीवरील कौटुंबिक मालिकेची पार्श्वभूमी वापरण्यात आली आहे. टीव्ही मालिकेतील पात्र दाखवत यामध्ये अभियनातील अतिशयोक्ती दाखवत उपहासात्मकपणे मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. 

दरम्यान ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने नाराजी जाहीर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली असून, कानाखाली मारल्यासारखं वाटत आहे असं म्हटलं आहे. तन्मय भट्ट, देवैया बोपन्ना आणि त्यांच्या टीमने लिहिलेल्या या जाहिरतीचं दिग्दर्शन अयप्पा केएमने केलं आहे. 

रश्मी देसाईने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून माझ्या कामाला सुरुवात केली. यानंतर मी टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. लोक या छोटी स्क्रीन म्हणतात. जिथे सामान्य लोक बातम्या, क्रिकेट, सर्व बॉलिवूड चित्रपट आणि अनेक गोष्टी पाहू शकतात. पूर्णपणे अनपेक्षित असणारी ही जाहिरात पाहिल्यानंत मला सर्व टीव्ही इंडस्ट्री आणि टीव्हीत काम करणाऱ्या लोकांसाठी अपमानजक वाटत आहे. कारण आम्हाला सतत फार छोटे आहोत अशी भावना निर्माण केली जाते, तसंच अशी वागणूकही दिली जाते. अशाच प्रकारे आम्हाला नेहमी वागवलं जातं. प्रत्येकजण मेहनत करत आहे".

fallbacks

पुढे ती म्हणाली आहे की, "टीव्ही कार्यक्रमात हे सर्व नाही दाखवत. हे सर्व मोठ्या स्क्रीनवर होतं. काही सत्य दाखवण्यात गैर नाही, पण सर्व टीव्ही इंडस्ट्रीसाठी ही सत्यतेची पडताळणी आहे कारण मला कानाखाली मारल्यासारखं वाटत आहे. मी कदाचित गरजेपेक्षा जास्त व्यक्त होत आहे, पण आम्ही प्रेक्षकांना प्रेम आणि संस्कृती दाखवतो. मला फार वाईट वाटत आहे, कारण टीव्ही इंडस्ट्रीत मी सन्मानजनक प्रवास केला आहे. तुम्ही सर्व माझ्या भावना समजून घ्याल अशी आशा आहे".

दरम्यान रश्मी देसाई संतापली असली तरी अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी जाहिरातीचं कौतुक केलं आहे. यामध्ये रश्मी देसाईचे टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सह-कलाकारही आहेत. 

Read More