Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंहने 'त्या' आजीसाठी भर रस्त्यात थांबवली Lamborghini

पुन्हा एकदा रणवीरचं वेगळेपण अधोरेखित 

रणवीर सिंहने 'त्या' आजीसाठी भर रस्त्यात थांबवली Lamborghini

मुंबई : रणवीर सिंह (Ranveer Singh) हा बॉलिवूडमधील Cool अभिनेता म्हणून ओळखला जातो. कायमच आपले कपडे आणि व्हिडिओ यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. रणवीर सिंहचा चाहता वर्ग त्याच्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. असाच एक रणवीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महत्वाची बाब म्हणजे रणवीर सिंहचा हा (Ranveer Singh stop Lamborghini, chats with an elderly fan) व्हिडिओ पाहून चाहत्यांना त्याचा आणखी अभिमान वाटणार आहे. 

रणवीर सिंह आपल्या सिनेमाच्या डबिंगकरता स्टुडिओत पोहोचला. त्याची सर्वात महागडी कार लॅम्बोर्गिनी घेऊन गेला होता. ही कार तो स्वतः चालवत होता. डबिंग झाल्यानंतर तो स्टुडिओतून बाहेर पडल्यावर फोटोग्राफर्सना पोझ देत होता. (दीपिका रणवीरचा 'हा' व्हिडीओ व्हायरल, चर्चा तर होणारच) 

तेव्हा एक वृद्ध महिलेने रणवीरला आवाज दिला. क्षणाचाही विलंब न करता रणवीर त्या महिलेला शोधू लागला. त्या वृद्ध महिलेजवळ जावून त्याने भेट घेतली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. खूप वेळ गप्पा मारल्यानंतर त्याने त्या महिलेच्या आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या हाताचं चुंबन घेऊन प्रेम व्यक्त केलं. 

यानंतर रणवीर सिंह तेथून निघून गेला. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडिओ खूप लोकप्रिय होत आहे. याच व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओतून पुन्हा एकदा रणवीर सिंहचा दयाळूपणा समोर आला आहे. 

Read More