Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉक्स ऑफिसवर सलमान-रणवीर आमनेसामने येणार?

डिसेंबर २०१८ मध्ये अनेक मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. एकीकडे शाहरूख खानचा ‘झिरो’ हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

बॉक्स ऑफिसवर सलमान-रणवीर आमनेसामने येणार?

मुंबई : डिसेंबर २०१८ मध्ये अनेक मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. एकीकडे शाहरूख खानचा ‘झिरो’ हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार आहे. तर रणवीर सिंहचा ‘सिम्बा’ सुद्धा डिसेंबरमध्ये रिलीज होणा-या सिनेमांच्या यादीत आहे. 

रणवीर - सलमान आमनेसामने

रोहित शेट्टी म्हणाला की, दोन्हीही सिनेमांच्या कथा खूप वेगळ्या आहेत. तर दुसरीकडे ‘दबंग ३’ करत असलेल्या अरबाज खान याने यावर अजून काहीच स्पष्टता दिली नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचा ‘दबंग ३’ सिनेमा रणवीरच्या ‘सिम्बा’ सोबत क्लॅश होऊ शकते. हे दोन्ही सिनेमांमध्ये पोलीस हा सारखा धागा आहे. 

कधी होणार रिलीज?

‘दबंग ३’ बाबत अशीही चर्चा आहे की, हा सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. पण अजूनही अधिकृत यावर काहीही सांगण्यात आलं नाहीये. रणवीर सिंह हा दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच काम करत असून या तो वेगळ्याच अंदाजात बघायला मिळणार आहे. त्यामुळे या सिनेमाचीही उत्सुकता आधीच वाढली आहे. तर दुसरीकडे सलमान खानच्या ‘दबंग’ सीरिजचीही मोठी क्रेझ आधीपासूनच आहे. त्यामुळे जर तसे झाले तर दोन्ही सिनेमांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

Read More