Marathi News> मनोरंजन
Advertisement

न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंग आता नव्या अवतारात... आता केलं 'हे' फोटोशूट

इतकं सगळं झाल्यानंतरही रणवीरची हौस काही केल्या संपत नाहीये.

न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंग आता नव्या अवतारात... आता केलं 'हे' फोटोशूट

Ranveer Singh Rampwalk: नुकतेच रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट आपल्या इन्टाग्रामपेजवरून शेअर केले होते. त्यानंतर त्याच्या या फोटोशूटवरून बराच गदारोळही झाला होता. त्याच्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रणवीरच्या फोटोशुटवर अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यासोबत रणवीरमुळे न्यूड फोटोशूटचा ट्रेण्डच सुरू झाला आणि अनेक सेलिब्रेटी मंडळीही आपापले न्यूड फोटोशूट शेअर करू लागले. 

इतकं सगळं झाल्यानंतरही रणवीरची हौस काही केल्या संपत नाहीये. आता रणवीर एका नव्या अवतारात आपल्या चाहत्यांसमोर आला आहे. यावेळी तो एकटा नसून आता आपल्या पत्नीला म्हणजेच दीपिका पदूकोनलाही सोबत घेतले आहे. हे निमित्त ठरले जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या फॅशन शोच. 'मिजवान फॅशन शो 2022' या फॅशन शोचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये रणवीरसह पत्नी दीपिका पादूकोन शो स्टॉपर म्हणून हजर होते. हा संपुर्ण शो अभिनेत्री शबाना आझमी यांनी होस्ट केला होता. 

यावेळी रणवीरने कुठलीच अतरंगी फॅशन केली नव्हती ना कुठलाच फंकी लुक केला होता. काळ्या रंगाच्या आणि भरगच्च एमब्रोयडरी असलेली शेरवानी आणि त्याला साजेशी हेअरस्टाईल बस्स... इतकाच रणवीरचा लुक होता. त्यामुळे या नव्या लुकने रणवीरने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. 

या फॅशन शोचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात दीपिका पदुकोण 'मिजवान फॅशन शो 2022' मध्ये रणवीर सिंगसोबत रॅम्पवर शाही लुकमध्ये दिसत होती. रणवीरचा हात धरत तिने रॅम्पवॉक केला आणि रॅम्पवरच त्या दोघांनी एकमेकांना किसही केलं.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौरी खान, करण जोहर, विद्या बालन, नोरा फतेही आणि इशान खत्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी शबाना आझमी यांनी त्यांच्या एनजीओ 'मिजवान वेलफेअर सोसायटी'च्या सहकार्याने आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या शोला रणवीरची आई अंजू भवनानीही उपस्थित होती. त्यावेळी आपल्या आईला पाहिल्यावर रणवीर त्यांच्या पायाही पडला. त्याचा हा गेस्चर पाहून त्याचे चाहते त्याच्यावर भलतेच खुश झाले आणि म्हणाले. ''बहुत संस्कारी हैं''. एका व्यक्तीने लिहिले, "रणवीर एक उत्तम अभिनेता आणि एक चांगला माणूस आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर रणवीरच्या फॅन्सनी दीपिका पदुकोण आणि रणवीरच्या रॅम्प वॉकचे फोटो शेअर केले आहेत. रणवीरने पांढऱ्या एम्ब्रॉयडरीसह काळ्या शेरवानीमध्ये पोनीटेल अशी फॅशन केली होती. तर दीपिकाने पांढरा आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा आणि स्टेटमेंट मेकिंग नेकलेस घालून ग्लॅमरस लुक केला होता.

Read More