Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंहचा पहिल्या ऑडिशनमध्ये असा होता स्वॅग, एक्टिंग पाहून हसू लागले सगळे कंटेस्टंट

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. 

रणवीर सिंहचा पहिल्या ऑडिशनमध्ये असा होता स्वॅग, एक्टिंग पाहून हसू लागले सगळे कंटेस्टंट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. रणवीरने इंडस्ट्रीमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. रणवीर सिंगने आपल्या मेहनतीमुळे आणि क्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत हे स्थान मिळवलं आहे. पण आज आम्ही तुम्हाला रणवीर सिंगच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडिओ दाखवणार आहोत. जो तुम्हाला त्याच्या स्वॅगचं वेड लावेल.

रणवीर सिंग इंडस्ट्रीत त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. रणवीर सिंगचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नव्हतं. हा व्हिडिओ रणवीर सिंगच्या पहिल्या ऑडिशनचा आहे. व्हिडिओमध्ये रणवीर सिंगने चेक्स ब्लू शर्ट आणि जीन्स घातलेला दिसत आहे. या ऑडिशनमध्ये स्पर्धकांना काही एक्शन करुन दाखवायच्या होत्या.

पण रणवीर सिंग कॅमेऱ्यासमोर येताच एक्शन सीनऐवजी डान्स स्टेप्स करायला लागतो. त्याची ही स्टेप पाहून तिथे उपस्थित इतर स्पर्धकही जोरजोरात हसू लागतात. व्हिडिओच्या शेवटी रणवीर शांत दिसत आहे. पण त्यावेळीही अभिनेत्याच्या या अनोख्या स्टाइलने सगळ्यांचीच मनं त्याने जिंकली होती.

Read More