Marathi News> मनोरंजन
Advertisement

Drugs connection : दीपिकाचं नाव समोर येताच रणवीर ट्रोल

दीपिका आज मुंबईत दाखल होणार आहे.   

Drugs connection : दीपिकाचं नाव समोर येताच रणवीर ट्रोल

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी बॉलिवूड मधील ड्रग्स कनेक्शन समोर आलं आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या जबाबानंतर ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची नावे समोर आली आहेत. यानंतर आता ड्रग्स प्रकरणामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाची देखील भर पडली आहे. 

शनिवारी म्हणजे २५ सप्टेंबरला एनसीबी दीपिकाची चौकशी करणार आहे. त्यामुळे दीपिका आज मुंबईत दाखल होणार आहे. ती सध्या गोव्यात आहे. दीपिकाला चार्टर विमानाने मुंबईत दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

ड्रग्स प्रकरणात दीपिकाचं नाव समोर आल्यानंतर तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. 

Read More