Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : पतीच्या या सवयीला कंटाळली राणी मुखर्जी, म्हणाली- आमच्यात कधी प्रेम तर कधी हिंसा!

सहसा राणी मुखर्जी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री व्यक्त झाली आहे.  अलीकडेच तिने पती आदित्य चोप्राच्या अशा अनेक सवयींचा खुलासा केला, ज्या सवयींवर ती खूप नाराज आहे.

धक्कादायक : पतीच्या या सवयीला कंटाळली राणी मुखर्जी, म्हणाली- आमच्यात कधी प्रेम तर कधी हिंसा!

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राणी मुखर्जीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेकवेळा ती तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना गुसबंप देते. त्यामुळेच ती निर्मात्यांची आणि प्रेक्षकांची पहिली पसंती असते. परंतु अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं क्वचितच आवडतं. पण अलीकडेच तिने आपल्या वैवाहिक आयुष्यातील अनेक महत्त्वाची गुपितं उघड केली आहेत.

सहसा राणी मुखर्जी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री व्यक्त झाली आहे.  अलीकडेच तिने पती आदित्य चोप्राच्या अशा अनेक सवयींचा खुलासा केला, ज्या सवयींवर ती खूप नाराज आहे. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही तिने तिच्या लग्नाचा अनुभवही शेअर केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ती रोज आदित्यला कशी हैराण करते. पतीला गरीब म्हणत राणीने सांगितले की, त्यांच्या वैवाहिक जीवनात एक दिवस रोमान्स असतो आणि दुसऱ्या दिवशी हिंसा.

खरं तर, फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राणी मुखर्जीने सांगितलं की, तिची सासू पैम चोप्राने आदित्यला सांगितलं होतं की, आदित्य लहान असताना तो खूप गाणी गुणगुणायचा  आणि लग्नानंतर त्याने पुन्हा गुणगुणायला सुरुवात केली आहे.  यानंतर अभिनेत्रीला विचारलं की, तुझ्या आयुष्यात त्याच्या येण्याने तुझं आयुष्य अधिक आनंदी झालं आहे का? असं जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्री म्हणाली, 'मला वाटतं की कोणत्याही नात्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांना रोज हैराण करत राहिलं पाहिजे आणि मी रोज आदित्यला हैराण करत असते.

एक दिवस रोमान्स, एक दिवस हिंसा
आपला मुद्दा पुढे ठेवत राणी म्हणाली, ''प्रत्येक दिवशी जेव्हा तो मला सकाळी बघतो तेव्हा रोज काही ना काही नवीन अंदाज पाहायला मिळते. तो बिचारा खूप साधा माणूस आहे. पण साधं असणं किती बोरिंग आहे.  मी काय सांगू तुम्हाला.  त्याच्यासाठी, हे दररोज नवीन चॅनेल सेट करण्यासारखं होतं. एक दिवस कॉमेडी, एक दिवस ड्रामा आणि एक दिवस हिंसा. पुन्हा एक दिवस रोमान्स.'

Read More