Marathi News> मनोरंजन
Advertisement

राणी मुखर्जीने खरेदी केलं कोट्यवधी रूपयांचं घर; शेजारी असतील प्रसिद्ध क्रिकेटर

राणी मुखर्जीच्या नव्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

राणी मुखर्जीने खरेदी केलं कोट्यवधी रूपयांचं घर; शेजारी असतील प्रसिद्ध क्रिकेटर

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने मुंबईत एक भव्य घर खरेदी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार राणीने रूस्तमजी पॅरामाउंट कम्युनिटीमध्ये 4 प्लस  3 बीएचके फ्लॅट खरेदी केलं आहे. अरबी महासागराचे सुंदर दृश्य या ठिकाणावरून दिसतं. राणी शिवाय या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी घरे खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या राणीच्या नव्या घराची चर्चा सर्वत्र रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे राणीच्या नव्या घराची किंमत जवळपास 7 कोटी 12 लाख असल्याचं सांगितलं जात.  22 माळ्याच्या ही इमारत आहे. 

रुस्तमजी पॅरामाउंटहून समुद्राच्या लाटा पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. एवढेच नाही तर ते बांद्रा खार जवळ देखील आहे.  तिचा फ्लॅट बराच प्रशस्त आहे आणि इथे दोन वाहनांसाठी पार्किंगची सुविधा मिळेल. शिवाय याठिकाणी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इमारतीमध्ये आउटडोर फिटनेस स्टेशन, आर्ट‍िफ‍िश‍ियल रॉक क्लाइम्ब‍िंग एर‍िया आणि प्रशस्त गच्ची आहे. आजच्या काळात, लोक त्यांच्या मूलभूत दैनंदिन दिनक्रमात फिटनेसचा समावेश करतात, ज्यामुळे हे स्थान आणखी आकर्षक आहे. याठिकाणी अनेक सेलिब्रिटी राहतात. 

अलीकडेच, क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनीही या ठिकाणी 4 प्लस 4 BHK अपार्टमेंट खरेदी केला आहे. त्याच्या या प्रशस्त घराची किंमत सुमारे 28 ते 30 कोटी रूपये आहे. दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांनीही येथे घर खरेदी केल्याची चर्चा होती. 

Read More