मुंबई : रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाला प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने भरपूर रेकॉर्ड मोडले आहेत. सिनेमा रिलिज झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसांत या सिनेमाने विक्रम रचला. विकेंडमध्ये संजूने धमाकेदार कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 10 रेकॉर्ड तोडले आहेत. वीक डेजमध्ये देखील या सिनेमाने चांगल कलेक्शन केलं आहे.
रमेश बाला यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या दिवशी या सिनेमाचं 27 करोड कलेक्शन राहिलं आङे. संजू या सिनेमाने शुक्रवारी 34.75 करोड शनिवारी 38.60 करोज रुपये कमाई केली असून रविवारी या सिनेमाने 46.71 करोड रुपये तर सोमवारी 27 करोड रुपये बिझनेस केला आहे. आतापर्यंत संजू सिनेमाने 147.06 करोड बिझनेस केला आहे.
#Sanju 's Monday - July 2nd #India Nett Early Estimates around ₹ 27 Crs..
— Ramesh Bala (@rameshlaus) July 3, 2018
Highest for a non-holiday Monday!
या आकड्यांकडे पाहता हा सिनेमा नक्की विक्रम रचेल यात शंका नाही. फक्त 4 दिवसांत केलेल्या कमाईमुळे पुन्हा एकदा राजकुमार हिरानी यशस्वी ठरला आहे. या सिनेमामुळे रणबीर कपूरची जोरदार चर्चा होत आहे. संजू हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात 200 करोड रुपयांचा आकडा पार करेल अशी शंका वर्तवण्यात येत आहे.