Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलियासोबत खरंच लग्न करेल रणबीर? सर्वांसमोर नाकारलं....

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत.  

आलियासोबत खरंच लग्न करेल रणबीर? सर्वांसमोर नाकारलं....

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत असताना रणबीरने एक मोठा खुलासा केला आहे. 

एका मुलाखतीत रणबीरला लग्नाची तारीख विचारण्यात आली. यावर रणबीर म्हणाला, 'मीडियासमोर मी लग्नाची तारीख नाही सांगणार, पण आलिया आणि मी लवकरचं लग्न करणार आहे....'

यावेळी रणबीरने लग्नाची तारीख तर नाही सांगितलं, पण आलियासोबतचं लग्न करणार असल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर लवकरचं त्यांच्या नात्याला नवं नाव देतील... हे स्पष्ट झालं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण एका साडी फॅशन ब्रँड आणि डिजायनरसोबत आलिया आणि रणबीरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.  महत्त्वाचं म्हणजे ज्या डिझायनरसोबत तिचा फोटो व्हायरल होत आहे, ती ब्रायडल साडी डिझाईनसाठी ओळखली जाते. 

एकंदर कपूर आणि भट्ट कुटुंबाची उत्सुकता पाहात आलिया आणि रणबीरचं लवकरचं लग्न होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.   

Read More