Marathi News> मनोरंजन
Advertisement

लाडक्या लेकीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीरला अश्रू अनावर; कुटुंबीयही झाले भावुक

 रणबीर कपूर विशेष आनंदी आहे कारण त्याने अनेक मुलाखतीत हे स्पष्ट केलं होत कि त्याला मुलगीच हवी आहे.

लाडक्या लेकीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीरला अश्रू अनावर; कुटुंबीयही झाले भावुक

Ranbir Kapoor hold his baby for the first time : अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरला (ranbir kapoor) कन्यारत्न प्राप्त झालं (alia bhatt first post after giving birth to baby girl).. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे.
रविवारी सकाळी 7.30 वाजता आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.

महत्त्वाचं म्हणजे यावेळी आलियासोबत पती आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) देखील होता. आलिया डिलीव्हरीसाठी (Alia Bhatt delivery) रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते आनंदात होते. 

आणखी वाचा: Name ideas for twins :जुळ्या मुलांसाठी ही आहेत हटके आणि स्टायलिश नावं

गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर आलिया आणि रणबीरवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कपूर कुटुंबात तर सगळीकडे आनंदच आनंद आहे.

 रणबीर कपूर विशेष आनंदी आहे कारण त्याने अनेक मुलाखतीत हे स्पष्ट केलं होत कि त्याला मुलगीच हवी आहे. आणि  झालीये.

आणखी वाचा: viral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया

कन्यारत्न झाल्याने त्याची ही इच्छादेखील पूर्ण झाली आहे. रणणबीरने पहिल्यांदा लेकीला हातात घेतलं तेव्हा तो भावूक झाला होता. लेकीला पाहता क्षणी रणबीरला अश्रू अनावर झाले होते.

रणबीरला रडताना पाहून उपस्थित कुटुंबियांच्या डोळ्यांमध्येही पाणी आलं. 

आलियाने चाहत्यांना 'गुडन्यूज' (good news) इंस्टाग्राम वर एक खास पोस्ट करत दिली होती त्यानंतर चाहते दोघांना शुभेच्छा देऊ लागले. .  (alia bhatt first post after giving birth to baby girl )

आलियाने आधीच सांगितलं मुलीचं नाव 

आलिया भट्टने जन्माआधीच बाळाच्या नावाबाबत संकेत दिले होते.  डिलीव्हरी आधीच आलियाने होणाऱ्या बाळाचं नाव ठरवलं होतं.  (ranbir kapoor alia bhatt baby name) आलियाने स्वतःच्या आणि पती रणबीरच्या नावावरुन बाळाचं नाव ठरवलं होतं.

आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं प्रमोशन करत होती. तेव्हा आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला. मुलाखती दरम्यान आलियाला विचारलं, 'तिचं नाव आलिया ऐवजी दुसरं असतं, तिने कोणत्या नावाची निवड केली असती.' तेव्हा आलियाने आवडत्या नावाबद्दल सांगितलं. (ranbir kapoor alia bhatt baby)
आलिया भट्टने तिचं आवडतं नाव आयरा सांगितलं. आयरा नावाचं वैशिष्ट्य म्हणजे आलियाच्या नावाचं पहिलं अक्षर सुरुवातीला 'आ' असून , रणबीरच्या नावाचं पहिलं अक्षर शेवटी 'र' आहे. त्यामुळे आलिया आपल्या मुलीचे नाव आयरा ठेवू शकते असा अंदाज बांधला जात आहे. (alia bhatt and ranbir kapoor blessed baby girl)

Read More