Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीर कपूरची मराठीत एंट्री

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितचा बकेट लिस्ट हा पदार्पणातील सिनेमा येत्या २५ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

रणबीर कपूरची मराठीत एंट्री

मुंबई : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितचा बकेट लिस्ट हा पदार्पणातील सिनेमा येत्या २५ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रत्येकाच्या आयुष्यातील काही इच्छा आकांक्षा असतात. याच इच्छा आकांक्षा म्हणजेच बकेट लिस्ट. आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे या आयुष्यात जितक्या जमतील तितक्या लिस्टमधील गोष्टी करुन घ्याव्यात. कोण जाणे उद्या काय होईल. अशाच काहीशा आशयाचा हा सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे माधुरी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय मात्र त्यासोबतच बॉलीवूडचा आणखी एक हिरो मराठीत एंट्री घेतोय. या सिनेमात त्याची जरी पाहुण्या कलाकाराची भूमिका असली तरी ती तितकीच लक्षवेधी ठरतेय. बॉलीवूडचा हा चॉकलेट हिरो दुसरा तिसऱा कोणी नसून रणबीर कपूर आहे. 

सईच्या बकेट लिस्टमधील विश पूर्ण करताना तिला रणबीरसोबत सेल्फी हवाय अशीही विश असते. यावर माधुरी म्हणते हे कसं शक्य आहे. यावर रणबीर म्हणतो हे का शक्य नाही...

याआधी बॉलीवूडचा दबंग खान सलमानने रितेश देशमुखच्या लय भारी या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. बॉलीवूडचे अनेक स्टार मराठीत येऊ लागलेत. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीचे चित्रही लवकरच बदलेल असे म्हणण्यास हरकत नाही. 

Read More