Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ranbir Kapoor चं 8 आकड्याशी खास कनेक्शन; अभिनेत्यासाठी सासऱ्याचा मोठा निर्णय

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जर आपण पाहिलं तर बर्याचदा 8 नंबरचं कनेक्शन आपण  पाहू शकतो,

 Ranbir Kapoor चं 8 आकड्याशी खास कनेक्शन; अभिनेत्यासाठी सासऱ्याचा मोठा निर्णय

Aalia Ranbeer Brahmastra movie special screening:सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt) त्यांच्या आगामी ब्रम्हास्त्र(brahmastra) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. 

शुक्रवारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाला सुद्धा रिलीजच्या आधी  boycott चा सामना करावा लागत आहे. मात्र सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी प्रमोशनसाठी अतोनात मेहनत करताना दिसत आहेत 

9 सप्टेंबरला सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे मात्र त्या आधी 8 सप्टेंबरला सिनेमाचं खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे . ८ तारखेलाच सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यामागे एक खास कारण आहे .

खरतर रणबीर आणि आलिया ने या विषयी बऱ्याचदा सांगितलं आहे कि, 8 हा आकडा रणबीरचा लकी नंबर(8 IS LUCKY NUMBER OF RANBEER KAPOOR) आहे. आणि याच दिवशी सिनेमाच्या टीमला चाहत्यांसोबत एकत्र सिनेमा पाहायचाय असा अयान मुखर्जी  ( ayan Mukherji)  म्हणतोय .

हेही वाचा:Aishwarya Rai चा पासपोर्ट व्हायरल.. बच्चन कुटुंबाच्या सुनेचे 'हे' डिटेलस पाहून चाहते हैराण …

आलिया रणबीच्या लग्नात (alia ranbir wedding)आलियाच्या वडिलांच्या जागी असणारा करण जोहरने सर्व कर्तव्य पार पडली त्यानंतर त्याने पोस्ट करून दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे रणबीर तर करणला सासराचं मानतो असं म्हणायला हरकत नाही.

आता ब्राह्मास्त्र सिनेमा चालावा म्हणून सगळेच प्रयत्न करताना दिसत आहेत,अशात सिनेमाची टीम आणि प्रोड्युसर कारण जोहर यांनी स्पेशल स्क्रीनिंग ठेवायचं ठरवलं आहे  

सिनेमाच्या ट्रेलर मध्ये जर आपण पाहिलं तर बर्याचदा 8 नंबरचं कनेक्शन आपण  पाहू शकतो,आलियाला वाचवण्यासाठी रणबीर एका शस्त्राचा वापर करतो ते शस्त्र सुद्धा इन्फिनिटी साइन प्रमाणे दिसते. आणि चित्रपटाच्या  ट्रेलरमध्ये सर्व शस्त्रांबद्दल माहिती दिसते जी डार्क  ऊर्जा

मिळवण्याचा प्रयत्न करते ती एकूण आठ घटकांइतकी असते. जे पुन्हा एकदा आठ बद्दल संदर्भ देते. रणबीरच्या अनेक गोष्टींमध्ये आठवा क्रमांक दिसतो. त्याच्या फुटबॉल जर्सीपासून ते वाहनांच्या क्रमांकापर्यंत आठ क्रमांक दिसतो.

 ब्रह्मास्त्राच्या रिलीजपूर्वी बरेच वाद पाहायला मिळत आहेत 

रणबीरच्या एका जुन्या वक्तव्यामुळे अभिनेत्याला विरोधाचा सामना करावा लागत आहे. रणबीर कपूरने सांगितले होते की, त्याला बीफ आवडतं आणि तो बीफप्रेमी आहे. अभिनेत्याच्या या वक्तव्यमुळे सध्या वातावरण तापलं आहे. 

(boycott Ranbir Kapoor)'ब्रह्मास्त्र' बॉयकॉटच्या(boycott brahmastra) (boycott bollywood) विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहाता ब्रह्मास्त्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर (box office) किती कोटींपर्यंत मजल मारतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More