Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ram Charan : सुपरस्टार चिरंजीवी बनले आजोबा, राम चरण-उपासनाच्या घरी चिमुकलीचं आगमन

Ram Charan Upasana Child : दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी लग्नाच्या 11 वर्षानंतर पालक झाले आहे. उपासनाने आज (20 जून) यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Ram Charan : सुपरस्टार चिरंजीवी बनले आजोबा, राम चरण-उपासनाच्या घरी चिमुकलीचं आगमन

Ram Charan and wife Upasana Konidela : RRR फेम दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांना कन्यारत्न झाले आहे.  उपासनाने आज (20 जून) एका गोंडा मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या जवळपास 11 वर्षेनंतर राम आणि उपासना आई-बाबा झाले आहे. सोमवारी रात्री उपासनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज तिने एका गोंडस चिमुकलीली जन्म दिला. ही बातमी सध्या वाऱ्यासारखा पसरत असून राम आणि त्यांचे चाहते व उपासनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Ram Charan and wife Upasana Konidela welcome baby girl )

उपासनाला हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (20 जून) सकाळी हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करून राम आणि उपासना यांना मुलगी झाल्याची अधिकृत माहिती दिली. दरम्यान राम चरणे बाळाच्या काही तास आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने  कालभैरवने त्यांच्या बाळासाठी बनवलेली एक ट्यून शेअर केली अन् अवघ्या काही तासातच ही आनंदाची बातमी मिळाली. 

राम आणि उपासना 14 जून 2012 रोजी विवाहबंधनात अडकले. 5 दिवसांपूर्वी या दोघांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. उपासनाने आपली प्रेग्नेंसी जाहीर केल्यापासून ती बरीच चर्चे होती. लग्नाचा वाढदिवस साजरा करतानाही उपासनाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

यावेळी उपासना आणि राम चरण दोघांनीही सांगितले असते की, आम्ही बाबा बनण्यास पूर्णपणे तयार आहोत. बाळाच्या आगमनासाठी सगळेच खूप उत्सुक आणि आतुर आहोत. थोडी काळजी वाटते, पण सगळं काही व्यवस्थित पार पडेल याची खात्री आहे. याचनिमित्ताने साऊथचे ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा आजी-आजोबा झाले असून सोशल मीडियावरही अभिनंदन अण्णा म्हणत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

चिरंजीवी हे टॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांना सुष्मिता, श्रीजा आणि रामचरण ही तीनच मुले आहेत. 14 जून 2012 रोजी राम चरणचे लग्न झाले होते. लग्नानंतर 11 वर्षांनी त्यांना कन्यारत्न मिळाले. अनेक वर्षांनंतर त्यांच्या घराचा उदरनिर्वाह झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची एक गोड इच्छा पूर्ण झाली. रामचरणच्या घरात ‘लक्ष्मी’चे आगमन झाल्यामुळे घरातील सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. 

Read More