Marathi News> मनोरंजन
Advertisement

मनमोहन सिंगांच्या बायोपिकमध्ये अटलजींची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता!

बॉलिवूडमध्ये बायोपिकचे सत्र सुरु झाले आहे.

मनमोहन सिंगांच्या बायोपिकमध्ये अटलजींची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता!

मुंबई : बॉलिवूडमध्ये बायोपिकचे सत्र सुरु झाले आहे. याचदरम्यान कॉग्रेसचे नेता आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनप्रवासावर 'द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाची निर्मिती सुरु झाली आहे. या सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणारे अनुपम खेर अटल बिहारी वाजपेयींसोबत हात मिळवताना दिसत आहेत.  

अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन हा फोटो शेअर केला आहे. फोटोत त्यांचासोबत अभिनेते राम अवतार भारद्वाज आहे. जे हुबेहुब अटलजींसारखे दिसत आहेत. 

सोशल मीडियावरील हा फोटो सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा वर्षाखेरीस प्रदर्शित होईल. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी वयाच्या ९३ व्या वर्षी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्णालयातून संध्याकाळी ५:३० मिनिटांनी जाहिर केलेल्या मेडिकल बुलेटिनद्वारे ही दुखद बातमी देण्यात आली. 

Read More