Marathi News> मनोरंजन
Advertisement

राखी सावंत पुन्हा एकदा येणार अडचणीत? एक्स पती आदीलने केला धक्कादायक खुलासा

असा एकही दिवस नसतो की, ड्रामा क्वीन चर्चेत येत नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा राखी वादाच्या भोवऱ्यातही सापडते. आता पुन्हा एकदा राखी वादात सापडू शकते

राखी सावंत पुन्हा एकदा येणार अडचणीत? एक्स पती आदीलने केला धक्कादायक खुलासा

मुंबई : बी-टाऊनची ड्रामा क्वीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. असा एकही दिवस नसतो की, ड्रामा क्वीन चर्चेत येत नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा राखी वादाच्या भोवऱ्यातही सापडते. आता पुन्हा एकदा राखी वादात सापडू शकते असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. याआधी राखी अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड अदिल खान दुर्रानीमुळे चर्चत होती. आधी अचानक रिलेशनशिप उघड केल्याने राखी चर्चेत होती तर यानंतर ती मुस्लिम धर्म स्विकारुन तिने बॉयफ्रेंडसोबत बांधलेली लग्नगाठ असो अनेकदा ती चर्चेत होती. 

मात्र राखी सावंतने अचानक तिच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर सांगून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. आदिल आणि राखीचं लग्न खूप चर्चेत आलं होतं. पण लवकरच त्यांच्या नात्यात दुरावा आला. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. यानंतर राखीने आदिलवर खूप गंभीर आरोप केले. राखीने आदिल खानवरही गुन्हा दाखल केला होता.. यानंतर आदिलला अटक करण्यात आली होती. आता नुकताच अदिल तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर आदिल खानने सांगितलं की, आता लवकरच तो राखीबाबत सगळं सत्य सांगणार आहे. आदिलने राखीबद्दल खूप गोष्टींचा खुलासा केला. तो म्हणाले की, मला आता सत्य लवकरच सगळ्यांना  सांगायचं आहे.  

राखी सावंतच्या आरोपांवर आदिल खानने तोडलं मौन  
या संपूर्ण प्रकरणावर आदिल खान म्हणाला, 'तुरुंगातून बाहेर आलोय, आता पत्रकार परिषदेत सगळं सांगेनच...' आता आदिल खान तुरुंगातून बाहेर आला आहे. मीडियाच्या प्रश्नांवर तो म्हणाला की, आता मी लवकरच राखी आणि तिच्यासोबत असलेल्या सर्व लोकांचे चेहरे उघड करणार आहे. माझ्यासोबत खूप चूकीचं झालं आहे, असंही आदिल खान म्हणाला. बऱ्याच दिवसांनी मी तुरुंगातून बाहेर आलो आहे. आज ना उद्या मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. मी माझ्या बाजू आणि माझ्यासोबत काय काय घडलं हे संपूर्ण लोकांसमोर आणणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री राखी सावंतने 29 मे 2022 रोजी आदिल खानशी लग्न केले होतं आणि तेव्हापासून आदिल तिला नेहमी मारहाण करत असे असं तिने सांगत आदिलवप गंभीर आरोप केले होते. अगदी आदिलने राखीकडून दीड कोटी रुपये घेतले होते. राखीने आदिलवर अभिनेत्रीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. आता संपुर्ण प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read More