Marathi News> मनोरंजन
Advertisement

रितेशची शेवटची आठवण राखी सांवतने टाकली फूसून

राखी सावंतने बिग बॉस 15 मध्ये  रितेशची ओळख तिच्या नवऱ्याच्या रूपात केली होती. 

रितेशची शेवटची आठवण राखी सांवतने टाकली फूसून

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतने तिचा एक्स पती रितेशच्या नावाचा टॅटू कायमचा काढून टाकला आहे. राखी सावंतने बिग बॉस 15 मध्ये  रितेशची ओळख तिच्या नवऱ्याच्या रूपात केली होती. जिथे हे उघड झालं की, रितेश राखीसोबत लग्न करण्याआधीच तो विवाहित आहे. 2019 मध्ये राखी आणि रितेशचं लग्न झालं आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये राखीने घटस्फोटाची घोषणा केली.

व्हिडिओमध्ये राखीने रितेशचा टॅटू काढण्याचा निर्णय तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आणि त्यानंतर टॅटू कलाकाराची ओळख करून दिली. मिरर सेल्फी घेतल्याने या व्हिडिओत आणखी दोन व्यक्ती आहेत. राखी म्हणाली, "आज मी माझ्या बॉडीवरचा रितेशचा टॅटू काढणार आहे." व्हिडिओमध्ये राखी वेदनेने आक्रोश करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टॅटू काढण्याच्या प्रक्रियेत राखी पुढे म्हणाली, "लग्नाला तीन वर्षे झाली.. रितेश, तू माझ्या आयुष्यातून आणि माझ्या शरीरातून कायमचा गेला आहेस. प्रेमात वेडं होऊन आयुष्यात कधीही टॅटू काढू नये. मग त्याला सोडून जाणं खूप कठीण होऊन बसतं." राखीला दुखत असल्याचं पाहून तिचे चाहते खूप दुःखी झाले आहेत.

Read More