Marathi News> मनोरंजन
Advertisement

Raju Srivastava यांना मुंबईच्या रुग्णालयात करणार दाखल? कुटुंबियांची प्रतिक्रिया

'अद्यापही काही सांगू शकत नाही.. ', 37 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या राजू यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर असं का म्हणाले?  

Raju Srivastava यांना मुंबईच्या रुग्णालयात करणार दाखल? कुटुंबियांची प्रतिक्रिया

मुंबई : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) गेल्या 37 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. मृत्यूच्या दारात असलेल्या राजू यांची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी म्हणून चाहते आणि कुटुंब सतत प्रार्थना (Fans and family continue to pray) करत आहेत. ते अद्यापही रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. हृदय विकाराचा झटका आल्यापासून ते बेशुद्ध आहेत. 37 दिवसांपासून रुग्णालयात असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दिपू श्रीवास्तव यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. 

'राजू श्रीवास्तव यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करणार का?' असा प्रश्न दिपू यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, '“राजू यांच्यावर एम्समध्येच उपचार केले जातील आणि त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ. आमचा येथील डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे.' 

fallbacks

कशी आहे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती?  (Raju Srivastava's health update)
राजू अद्यापही शुद्धीवर न आल्यामुळे कुटुंब आणि चाहते चिंतेत आहेत. जोपर्यंत राजू श्रीवास्तव शुद्धीवर येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबद्दल काहीही सांगता येणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ते गेल्या 37 दिवसांपासून रुग्णालयात आहेत. 

ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. त्याचा मेंदू नीट काम करत नाही, तर हात-पायांमध्ये थोडीशी हालचाल दिसून आली. (raju srivastava is still unconscious on ventilator)

राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने सोशल मीडियाद्वारे व्हीडिओ शेअर करून माहिती दिली की, ते बरे होत आहेत आणि डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांची सतत काळजी घेत आहे. (raju srivastava is still unconscious on ventilator)

Read More