Marathi News> मनोरंजन
Advertisement

हनीमूनचे फोटो पोस्ट केल्याने रजनीकांतची मुलगी ट्रोल

हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी तीला चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधान आले आहे.

हनीमूनचे फोटो पोस्ट केल्याने रजनीकांतची मुलगी ट्रोल

मुंबई : सुपरस्टार रजनीकांतची मुलगी 11 फेब्रुवारी रोजी लग्न बंधणात अडकली. अभिनेता-उद्योगपती विशागन वनंगमुदी आणि सौंदर्याने चैन्नईतील 'द लीला पॅलेस'मध्ये मोठ्या थाटात लग्न केले. लग्नानंतर सौंदर्याने त्यांच्या हनीमूनचे फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केल्यामूळे लोक नाराजी व्यक्त करत आहेत. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आल्यामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. तर दुसरीकडे सौंदर्या तिच्या हनीमूनचे फोटो शेअर करत आहे.

fallbacks

हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी तीला चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधान आले आहे. जनतेने सौंदर्याला दोन दिवस फोटो पोस्ट न करण्याचे आवाहन केले आहे. सौंदर्याचा पहिला विवाह उद्योगपती अश्विन राजकुमासोबत २०१० साली पार पडला होता. या दोघांना वेद नावाचा मुलगा देखील आहे. २०१६ साली सौंदर्याने न्यायालयात याचीका सादर केली होती. लग्नाच्या सात वर्षांनंतर दोघांनी संगनमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

सूत्रांच्या सांगणयानुसार ३५ वर्षीय अभिनेता विशागन वनंगमुदीचा सुद्धा हा दुसरा विवाह आहे. त्याचा पहिला विवाह मॅगजीन संपादक कनिखा कुमारन सोबत झाले होते. पण त्याचे लग्न जास्त काळ टिकले नाही. आता कनिखा निर्माता वरुण मनियनची पत्नी आहे. 

ग्राफिक्स डिझायनर म्हणून सौंदर्याने तिच्या करियरची सुरुवात केली होती. सौंदर्या ने 'बाबा', 'मजा', 'संदाकोझी' आणि 'शिवाजी' या सिनेमात काम केले आहे. २०१८ साली विशागन ने तमिळ सिनेमा 'वंजागर उलागम'मध्ये डेब्यू केला होता. विशागन एका औषध कंपनीचा मालक आहे.

Read More