Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह', पोस्टनंतर अभिनेता ट्रोल

सोशल मीडिया पोस्टनंतर अभिनेता ट्रोल...

'रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह', पोस्टनंतर अभिनेता ट्रोल

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची चाहत्यांमध्ये मोठी लोकप्रियता आहे. रजनीकांत यांना ट्रोल केल्यानंतर अनेकदा त्यांचे चाहते त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता रोहित रॉयने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टनंतर रोहितला रजनीकांत चाहत्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे.

रोहित रॉयने, रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह असून आता कोरोना क्वारंटाईनमध्ये आहे, अशी पोस्ट केली होती. रोहित रॉयने ही पोस्ट अतिशय मजेशीररित्या, विनोदी रुपात केली होती. या विनोदातून सध्या सुरु असलेलं वातावरण काहीसं हलकं करण्याचा रोहितचा प्रयत्न होता. सोशल मीडियावर मात्र रोहितचा हा जोक रजनीकांत यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही. चाहत्यांकडून हा जोक असंवेदनशील असल्याची भावना व्यक्त होत असून रोहित रॉयला ट्रोल करण्यात येत आहे.

 

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर रोहितनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ट्रोलर्सला उत्तर देत रोहितने सर्वांना शांत होण्यास सांगत, हा एक केवळ विनोद असल्याचं सांगितलं. हा टिपिकल रजनी सर स्टाईल जोक होता. या जोकद्वारे मी सर्वांना हसवण्याचा प्रयत्न करत होतो. प्रतिक्रिया देण्याआधी समोरच्या व्यक्तीचा हेतू पाहणं हेदेखील महत्त्वाचं असल्याचं तो म्हणाला. हा जोक पोस्ट करुन कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नसल्याचं सांगितलं आहे.

Read More