Marathi News> मनोरंजन
Advertisement

रजनीकांतची लेक ते करताना दिसली, ज्याचा कुणी विचारही केला नव्हता...

आता ऐश्वर्याही बॉलिवूडकडे वळली आहे. 

 रजनीकांतची लेक ते करताना दिसली, ज्याचा कुणी विचारही केला नव्हता...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या घटस्फोटाच्या बातमीने तिच्या चाहत्यांची निराशा केली होती. आता पुन्हा एकदा रजनीकांतची मुलगी चर्चेत आली आहे. यावेळेस हे कारण तिच्या चाहत्यांना खूश करणारं ठरत असल्याचं बोललं जात आहे.

ऐश्वर्या रजनीकांतने साऊथ इंडस्ट्रीत दिग्दर्शक आणि गायिका म्हणून स्वत:ची ओळख बनवली आहे, हे सर्वांनाच ठावूक आहे.

साऊथ इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर ती आता हिंदी चित्रपटांमध्ये काहीतरी नवीन करताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, धनुषची एक्स वाईफ ऐश्वर्या रजनीकांत ओ साथी चल नावाचा हिंदी चित्रपट दिग्दर्शित करत आहे. सत्य घटनेवर आधारित ही प्रेमकथा असणार आहे.

याची निर्मिती मीनू अरोरा करत आहेत, मीनू यांनी एका मुलाखतीत ऐश्वर्याच्या पदार्पणाबद्दल खुलासा केला आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्यापूर्वी  रजनीकांत आणि धनुष यांनीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ऐश्वर्याही बॉलिवूडकडे वळली आहे. 

ऐश्वर्या पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमासाठी दिग्दर्शन करत आहे. तिने हे काम याआधी कधीच केलं नव्हतं. हा तिचा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरत आहे. 

Read More