Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानच्या 'रेस ३' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई

 'रेस ३' या सिनेमाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. या वर्षातील पहिल्या दिवशी बंपर कमाई करणारा  'रेस ३' पहिला सिनेमा ठरला आहे.

सलमान खानच्या 'रेस ३' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई

मुंबई : निर्माता रेमो डिसूजा याचा मल्टीस्टारर सिनेमा 'रेस ३' शुक्रवारी रिलीज झाली. या सिनेमाबाबत मोठी अपेक्षा होती. मात्र, या सिनेमाला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. या सिनेमाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अभिनेता सलमान खानसाठी ही ईद खास ठरली आहे. कारण त्याच्या ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या  'रेस ३' या सिनेमाने पहिल्याच दिवशी २९.१७ कोटींची कमाई केली. या वर्षातील पहिल्या दिवशी बंपर कमाई करणारा  'रेस ३' पहिला सिनेमा ठरला आहे.

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांनी सलमानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. भाईजाननेही आपल्या चाहत्यांना निराश न करता सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सलमानच्या फॅन्सची मात्र  'रेस ३' या चित्रपटाने निराशा केली. सिनेमाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यानंतरही सिनेमाला मिळालेलं यश वाखाणण्याजोगं आहे.

हा वर्षातील 'रेस ३' हा सर्वोच्च चित्रपट बनला आहे. 'रेस ३'नंतर टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शन पाटणीची फिल्म' बाजी २ '(२५.१० कोटी), दीपिका पदुकोण, रणबीर सिंग आणि शाहिद कपूरची भूमिका असेलेला ' पद्मवत '(१९ कोटी) आणि करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्‍सानिया  'वीर द वेडिंग' (१०.७०कोटी) आदी चित्रपट या वर्षातील कमाई करणारे आहेत.

Read More