Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pushkaraj Chirputkar: आजीला झोपेत म्हणायचो 'अगं मला अवॉर्ड मिळतोय', अन् 25 वर्षानंतर स्वप्न सत्यात उतरलं!

Pushkaraj Chirputkar Awarded For Me Vasantrao Movie:  मी वसंतराव या चित्रपटासाठी पुष्कराज चिरपुटकरला पुरस्कार प्राप्त झाला. पुरस्कार मिळाल्यानंतर पुष्कराजचा आनंद गगनात मावेना झालाय. त्यावेळी त्याने एक पोस्ट (Emotional Post) शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pushkaraj Chirputkar: आजीला झोपेत म्हणायचो 'अगं मला अवॉर्ड मिळतोय', अन् 25 वर्षानंतर स्वप्न सत्यात उतरलं!

Pushkaraj Chirputkar Emotional Post : झी चित्र गौरव पुरस्कार सोहळामध्ये (Zee Chitra Gaurav Award Ceremony) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुष्कराज चिरपुटकर (Pushkaraj Chirputkar) याचा गौरव करण्यात आला. मी वसंतराव (Me Vasantrao) या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.  पुरस्कार मिळाल्यानंतर पुष्कराजचा आनंद गगनात मावेना झालाय. त्यावेळी त्याने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला Pushkaraj Chirputkar?

मी 12 वर्षांचा होतो. बाहेरच्या खोलीत झोपलो होतो. सकाळचे 6 वाजले असतील. मला काहीतरी वाजल्या सारखं वाटत होतं. मी उठून बसलो. वाटतं होतं की मला पुरस्कार मिळतोय पण जाताच स्टेजवर येत नाहीये. आजी आतून आली. म्हणाली, 'गाढवा, फोन वाजतोय, उचल की' मी म्हणालो 'अगं मला अवॉर्ड मिळतोय!' ती वैतागून म्हणाली 'झोप गपचुप.. अन् मी झोपलो..',  25 वर्षांनी उठलो तेव्हा खरंच माझं नाव घेतलं जात होतं, असं पुष्कराज चिरपुटकर म्हणतो.

पु.ल.देशपांडे (P. L. Deshpande) यांच्यासारखी माझी आवडती व्यक्तीरेखा साकारताना मला हा पुरस्कार मिळाला. झी चित्र गौरव हा माझा पहिला पुरस्कार आहे. माझे आवडते दिग्दर्शक निपूण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला, माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेल्या चित्रपटात म्हणजे मी वसंतराव. मला मधल्या 25 वर्षांची आठवण ठेवायची नाही. फक्त स्वप्नं सत्यात उतरतात, एवढंच मला म्हणायचंय, असं म्हणत पुष्कराज चिरपुटकरने भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

पाहा पोस्ट - 

दरम्यान, झी चित्र गौरव सोहळ्यामध्ये(Zee Chitra Gaurav Award) 'मी वसंतराव' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण 7 महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. या सर्वांचं कौतूक देखील पुष्कराजने केलंय.या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अनिता दाते (Anita Daate) यांना मिळाला आहे. 

Read More