Marathi News> मनोरंजन
Advertisement

सार्वजनिक वाहतूक उत्तम पर्याय - सोनम कपूर

लंडनमधील उबेरमध्ये सोनमला असा भयानक अनुभव आला की...

सार्वजनिक वाहतूक उत्तम पर्याय - सोनम कपूर

मुंबई : बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. सोनम नेहमी तिच्या कपड्यांमुळे आणि लूक्ससाठी चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोनम सध्या लंडनमध्ये आहे. पण लंडंनमध्ये दाखल होताच तिला एका कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा भयानक अनुभव तिच्या चाहत्यांना सांगितला आहे. 

उबेरमधून प्रवास करताना तिला एक भयानक अनुभव आला. त्यामुळे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करण्याचे आवाहन केले. यासंबंधतीत तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने चाहत्यांना सल्ला दिला. 

ती म्हणाली, 'लंडनमध्ये उबेरसोबत मला एक भयानक अनुभव आला आहे. काळजी घ्या. सर्वात जास्त सुरक्षित आणि चांगली सार्वजनिक वाहतूक आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.' सोनमच्या या ट्विटनंतर तिला एका नेटकऱ्याने काय झाले अशी विचारणा केली. 

तेव्हा सोनमने घडलेल्या घटनेचा खुलासा केला. वाहन चालक मानसिक संतूलन बिघडलेलं होतं. शिवाय तो सोनमवर मोठ्याने किंचाळत देखील होता. त्यामुळे मी अत्यंत घाबरले होते, असं ती म्हणाली. यानंतर उबेरने सोनमच्या ट्विटवर रीट्विट करत माफी मागीतली आहे. 

Read More