Marathi News> मनोरंजन
Advertisement

पद्मावती वादावर पहिल्यांदाच बोलली प्रियंका...

पद्मावती चित्रपटावर वादाचे वादंग उठले.

पद्मावती वादावर पहिल्यांदाच बोलली प्रियंका...

मुंबई : पद्मावती चित्रपटावर वादाचे वादंग उठले. त्याच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. मात्र आता कुठे वादातून बाहेर येत असल्याचे चित्र दिसत असताना यावर देसी गर्ल प्रियंका चोप्राने आपले मत मांडले.

काय म्हणाली प्रियंका?

ती म्हणाली की, मला आशा आहे की, प्रेक्षक या चित्रपटाची कला, सौंदर्य पाहू शकतील. त्याचबरोबर ती म्हणाली की, मी चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने नक्कीच उभी राहीन.

पद्मावतीवर आरोप 

पद्मावतीला सीबीएफसीकडून प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. ऐतिहासिक तत्त्वांशी छेडछाड केल्याचा आरोप काही राजपूत संघटना आणि राजकीय नेत्यांनी यावर केला आहे.

संजय सरांशी चांगले संबंध 

प्रियंका म्हणाली की, संजय सरांशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मला ते प्रचंड भावतात. मला माहित आहे की, ''चित्रपट प्रदर्शित होईल आणि त्यातील कला लोक पाहू शकतील. इतकंच नाही तर ती पुढे म्हणाली की दीपिका, रणवीर आणि शाहीद यांच्यासोबत मी नेहमीच असेन.''
त्याचबरोबर तिने विरूष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. 

 

Read More