Marathi News> मनोरंजन
Advertisement

राजस्थानच्या या महालात होणार प्रियंका - निकचं लग्न

या महालात थांबणार प्रियंका - निक 

राजस्थानच्या या महालात होणार प्रियंका - निकचं लग्न

मुंबई : बॉलिवूडमध्ये हे वर्ष अतिशय खास आहे. यावर्षी अनेक सेलिब्रिटीज लग्न बंधनात अडकत आहेत. दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या क्रेझमधून चाहते बाहेर पडत नाहीत तोपर्यंत देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाची गडबड सुरू झाली आहे. प्रियंका - निकच्या लग्नाचा वेन्यू अखेर ठरला आहे. 

दीपिकाने जिथे इटलीतील लेक कोमो येथे आपला विवाहसोहळा संपन्न केला तिथे आता प्रियंका चोप्रा आपल्या देशातील सर्वात रॉयल शहराला वेडिंग डेस्टिनेशन म्हणून निवडलं आहे. प्रियंका - निक जोधपुरच्या उमेद पॅलेसमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रियंका - निक 1 डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. प्रियंका अगदी पारंपरिक पद्धतीने राजस्थानमधील उमेद भवनात अतिशय शाही आणि रॉयल अंदाजात हे लग्न होणार आहे. या पॅलेसमध्ये वेडिंगचा वेन्यू हा 60,000 डॉलर प्रत्येत रात्रीचे असणार म्हणजे 43,15,500 रुपये एका रात्रीचे आकारले जाणार आहे. शुक्रवारी प्रियंका चोप्रा आई मधु चोप्रासोबत या ठिकाणी पोहोचली होती. 

एक दिवस राहायचे एवढे रुपये 

प्रियंका चोप्राने आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी उमेद भवनात 60 विशेष सजावटीच्या रूम बुक केल्या आहेत. इथे राहण्याचा एका रात्रीचा खर्च हा 922 डॉलर म्हणजे 66 हजार रुपये असणार आहे. 

हा उमेद पॅलेस आणि हॉटेल जवळपास 52 एकरमध्ये असून यामध्ये बगिचा, स्विमिंग पूल, स्पा, मसाज रूम आणि योगा रूममध्ये आहे. उमेद भवनचे दरवाजे पहिल्यांदा 1942 मध्ये उघडले गेले. त्यानंतर जोधपुरमधील राज परिवाराचं हे निवास स्थान राहिलं आहे. 

fallbacks

महाराणी सूटमध्ये थांबणार निक - प्रियंका 

उमेद भवन हे असं राजमहल आहे जिथली सजावट आणि वैभव लोकांना आकर्षित करत असतं. या हॉटेलमधील सर्वात चर्चेत असलेली खोली म्हणजे महाराणीची खोली आहे. याच खोलीत प्रियंका आणि निक जोनस राहणार असल्याची चर्चा आहे. 1 आणि 2 डिसेंबर रोजी यांच लग्न होणार आहे. 

Read More