Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रिया वॉरिअरला मिळालं असं चॅलेंज की भीतीने जोरजोरात ओरडू लागली

प्रिया प्रकाश वॉरिअरचा व्हिडिओ व्हायरल

प्रिया वॉरिअरला मिळालं असं चॅलेंज की भीतीने जोरजोरात ओरडू लागली

मुंबई : 18 वर्षाच्या प्रिया प्रकाश वॉरिअरला आज कोणतीही वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रियाचा तो चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही. पण त्याआधीच ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. प्रिया प्रकाश वॉरिअरचा मल्याळम सिनेमा 'ओरू अदार लव (Oru Adaar Love)' सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. पण प्रिया प्रकाश वॉरिअरचा व्हिडिओ आणि फोटो त्याआधीच व्हायरल होत आहेत. प्रियाने रविवार आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते रिव्हर्स रोलर-कोस्टर राईडची मजा घेतांना दिसत आहे. प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

'ओरू अदार लव (Oru Adaar Love)' सिनेमामध्ये प्रिया को-स्टार आहे. सिनेमातील अभिनेता रोशन अब्दुल राउफने प्रियाला रिव्हर्स रोलर कोस्टर राईडचं चॅलेंज दिलं होतं. प्रियाने ते चॅलेंज पूर्ण देखील केलं. पण या दरम्यान ती जोरजोरात ओरडत होती.

 
प्रियाला नंतर ही राईड इतकी आवडली की ती पुन्हा एकदा राईड घेण्यासाठी तयार झाली. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रियाच्या आधी रोशनने देखील या राईडची मजा घेतली.  

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशचा जन्म त्रिशूर (केरल) मध्ये झाला आहे. त्रिशूरच्या विमला कॉलेजमध्ये ती बी-कॉम पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. 'ओरू अदार लव'मध्ये देखील तिने एका विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. प्रिया प्रकाशची लोकप्रियता आज इतकी वाढली आहे की, इंस्टाग्रामवर तिचे 61 लाख फॉलोअर्स झाले आहेत. इतकंच नाही तर प्रिया आता प्रमोशनल पोस्टसाठी आठ लाख रुपये चार्ज करते.

 

Thank you for all the love and support

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

 

Read More