Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गुलाबी साडी'वर भन्नाट डान्स अन् सप्राइज Kiss... प्रिया बापट-उमेश कामतचा 'तो' Video Viral

Priya Bapat Umesh Kamat Viral Video: हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून सध्या तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यामागील स्पेशल कारणही प्रियाने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

'गुलाबी साडी'वर भन्नाट डान्स अन् सप्राइज Kiss... प्रिया बापट-उमेश कामतचा 'तो' Video Viral
Updated: Mar 31, 2024, 01:30 PM IST

Priya Bapat Umesh Kamat Viral Video: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती तसेच अभिनेता उमेश कामत सध्या प्रियाने आई होण्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे चर्चेत आहेत. लग्नाला 13 वर्ष झाल्यानंतरही मुलंबाळ का नाही यासंदर्भात प्रियाने आपलं मत मांडल्याची बातमी चर्चेत असतानाच आता हे सेलिब्रिटी कपल एका व्हायरल ट्रेण्डमुळे चर्चेत आलं आहे. प्रिया बापटने पोस्ट केलेल्या एक व्हिडीओ सध्या चाहत्यांना फारच आवडत असून तो व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर ठराविक काळानंतर कोणत्या ना कोणत्या गाण्यावरील रिल्स व्हायरल होत असतात. सध्या 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल' गाण्यावरील रिल चांगलेच व्हायरल झालेत. अगदी रेमो डिसोझापासून ते भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मापर्यंत अनेकांनी गुलाबी साडी गाण्यावर रिल्स केले आहेत. असं असतानाच आता यामध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत यांची भर पडली आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पती उमेशबरोबरचं खास रिल शेअर केलं आहे. यामध्ये प्रिया गुलाबी साडीमध्ये पारंपारिक वेशात दिसत आहे. तर तिच्याबरोबर उमेश सुद्धा कुर्ता आणि गुलाबी रंगाच्या कोटमध्ये दिसत आहे. दोघेही 'गुलाबी साडी' गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दोघेही अगदी गाण्यातील रिलिक्सप्रमाणे गुलाबी साडी, लाल लाली, फोटो काढणं यासारख्या स्टेप्स करताना दिसतात. रिलच्या शेवटी प्रिया उत्साहात उमेशच्या गळ्यात पडून अगदी टाचावर करुन त्याला गालावर किस देतानाही दिसते.

हा डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यामागे विशेष कारण

मात्र इतरांप्रमाणे प्रियाने केवळ ट्रेण्ड म्हणून हा व्हिडीओ शेअर केला नसून यामागे एक खास कारण असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. प्रिया बापटची निर्मिती असलेल्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा शंभारावा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपण फार उत्साही असून त्यासाठीच उत्साहात नाचत आहोत असं प्रियाने म्हटलं आहे. या नाटकामध्ये स्वत: प्रियाबरोबर तिचा पती उमेश कामतही प्रमुख भूमिकेत आहे.  "'जर तरची गोष्ट'च्या आगामी 100 व्या प्रयोगाच्या उत्साहात नाचत आहे. हा प्रयोग 7 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात होणार आहे," अशी कॅप्शन प्रियाने या व्हिडीओला दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

2 दिवसांमध्ये या व्हिडीओला 1 लाख 94 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 'जर तरची गोष्ट'मध्ये प्रिया-उमेशबरोबरच पल्लवी अजय आणि आशुतोष गोखलेही सहाय्याक कलाकारांच्या भूमिकेत आहेत.