Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रीती झिंटा देणार गोड बातमी ?

प्रिती झींटा प्रेग्नेंट असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

प्रीती झिंटा देणार गोड बातमी ?

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्रींच्या पर्सनल लाईफमधल्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात.

करिना प्रेग्नेंट असल्यापासून ते तैमूरच्या जन्मापासून वाढदिवसापर्यंतच्या चर्चा देशभरात सुरू होत्या. यामध्ये सध्या अभिनेत्री प्रीती झिंटाचा नंबर आहे.

प्रिती झींटा प्रेग्नेंट असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

२०१६ मध्ये लग्न 

 २०१६ मध्ये प्रीतीने तिचा बॉयफ्रेंड  जेन गुडइनफसोबत लग्न केले. आयपीएल दरम्यान ती चांगलीच चर्चेत राहिली.

त्यानंतर प्रसारमाध्यमांपासून दूर असलेली प्रीती अचनाक मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर येताना दिसली.

प्रीती प्रेग्नेंट ?

यावेळच्या फोटोंमध्ये ती प्रेग्नेंट असल्याचे दिसून येतेय. स्कार्फने बेबी बंप लपवतानाचे तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रीतीकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळाला नाहीए. 

या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा ढगळा शॉर्ट ड्रेस घातला असून काळ्या रंगाचा स्कार्फ घेतला आहे. 

Read More