Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रेग्नंट मॉडेलचा रॅम्प वॉकवर बोल्ड अंदाज; ड्रेसने वेधलं सर्वांच लक्ष

Shanina Shaik ची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे

प्रेग्नंट मॉडेलचा रॅम्प वॉकवर बोल्ड अंदाज; ड्रेसने वेधलं सर्वांच लक्ष

मुंबई : ऑस्ट्रेलियन मॉडेल  Shanina Shaik ची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अलीकडेच, कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये आयोजित amfAR चॅरिटी गालामध्ये Shanina Shaik रॅम्पवर दिसली. जर तुम्ही विचार करत असाल की प्रत्येक मॉडेल रॅम्पवर चालते. यात नवीन ते काय, तर Shanina Shaik चा रॅम्प वॉक अगदी वेगळा आहे. का आणि कसा याचं उत्तरही मिळेल

31 वर्षीय मॉडेल गर्भवती असून तिच्या रॅम्प वॉकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. amfAR चॅरिटी गालामध्ये, Shanina Shaik ने क्रीम-रंगाचा कट-आउट गाऊन परिधान केला होता. यालाच मॅचिंग वेलही तिने कॅरी केला होता.

fallbacks

कट-आउट गाऊन आणि मॅचिंग वेलमध्ये, Shanina तिच्या बेबी बंपला पूर्ण आत्मविश्वासाने फ्लॉंट करताना दिसली. तिच्या स्वॅगने सर्वांना आनंद दिला आहे. मॉडेलने स्टायलिश गाऊनसोबत न्यूड मेकअप केला होता. यासोबत तिने कोणत्याही प्रकारचे जड दागिने कॅरी केले नाहीत. बोटात फक्त एक नाजूक अंगठी घातली होती.

fallbacks

क्रीम कलरचा कट-आउट गाऊन आणि मॅचिंग वेलमध्ये तिने स्वत:ला इतक्या जबरदस्त पद्धतीने प्रेजेंट केलं की, पाहणारे तिच्यापासून नजर हटवू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन मॉडेल Shanin मॅथ्यू अदेसुयानला डेट करत आहे. रॅम्प वॉक दरम्यान ती कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचा हात धरताना दिसली. मॉडेलच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की, ती तिच्या रॅम्प वॉकसाठी खूप उत्साही आहे.

Read More