Marathi News> मनोरंजन
Advertisement

क्रिती सेनन सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म?

पहिल्यांदाच क्रिती आईच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहतेदेखील तिच्या या नव्या अंदाजासाठी उत्सुक आहेत.

क्रिती सेनन सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म?

मुंबई : कोरोनाचा सर्वांत जास्त फटका हा सिने इंडस्ट्रीला देखील बसलाये. सिनेमागृह बंद असल्याने अनेक मोठ-मोठे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात  आहेत. त्यात आता अभिनेत्री क्रिती सेननचा आगामी सिनेमा 'मिमी' देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. नुकताच क्रितीने सिनेमाचा फर्स्ट लूक रिवील  केलाये. या मोशन पोस्टरमध्ये क्रिती चक्क बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेयं.

क्रितीने शेअर केलेलं हे मोशन पोस्टर चांगलच व्हायरल होत आहे. क्रितीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. या सिनेमात क्रिती प्रेग्नेट  असल्याचं दाखवण्यात येणार असल्याचं या पोस्टरवरुन कळतंय. पहिल्यांदाच क्रिती आईच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहतेदेखील तिच्या या नव्या अंदाजासाठी उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

या सिनेमात ती सरोगसीद्वारे बाळाला जन्म देणार असल्याचं कळतंय. छोट्या गावात राहणाऱ्या मुलीची भूमिका क्रिती साकारणार आहे. या सिनेमात मराठमोळी  अभिनेत्री सई ताम्हणकर देखील झळकणार आहे. क्रिती आणि सई पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रिन शेअर करणार आहेत.
या सिनेमा पाठोपाठ क्रिती सेनन लवकरच अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'बच्चन पांडे' या सिनेमात दिसणार आहे.

Read More