Marathi News> मनोरंजन
Advertisement

'घरातल्याच माणसावर बायोपिक...', Maharashtra Shahir वर बोलताना प्रवीण तरडे असं का बोलले?

Pravin Tarde On Maharashtra Shahir Movie : महाराष्ट्र शाहिर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना महाराष्ट्र शाहीर म्हणजेच शाहीर साबळे यांच्या आयुष्य पाहता येणार आहे. तर अंकुश चौधरी हा या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. 

'घरातल्याच माणसावर बायोपिक...', Maharashtra Shahir वर बोलताना प्रवीण तरडे असं का बोलले?

Pravin Tarde On Maharashtra Shahir Movie : सध्या सगळीकडे ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काल 28 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम मिळत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी केले आहे. हा चित्रपट पाहून झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुक केलं आहे. त्यात अभिनेता प्रवीण तरडे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुक केलं आहे. बायोपिक करणं किती कठीण आहे हे सांगत घरातल्या व्यक्तीवर बायोपिक करण्यात किती फरक आहे या विषयी प्रवीण तरडे यांनी सांगितलं आहे. 

प्रविण तरडे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी चित्रपटाचं एक पोस्टर देखील शेअर केलं आहे. हे शेअर करत प्रविण तरडे म्हणाले, 'महाराष्ट्र शाहीर' तुमचा आमचा सिनेमा... एखादी बायोपिक करणं हेच मुळात शिवधनुष्य असतं आणि त्यात जर ती घरातल्याच माणसावर असेल तर काय घेऊ आणि काय नको असं होण्याची शक्यता जास्त असते.  पण ती शक्यता टाळून केदारने शाहीर साबळेंचे आयुष्य काय वेगवान पध्दतीने उलगडलय. हॅटसऑफ मित्रा... अंकुश चौधरी हा माणुस आणखी किती वर्ष प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पाडणार आहे... तू अफलातून शाहीर वठवलाय मित्रा ते करताना फक्तं अनुभवच नाही तर मेहनत सुध्दा दिसतीये तुझी... सना खूपच गोड दिसली आणि जणू काही तीचा दहावा चित्रपट असावा इतक्या सुंदरतेनं तिनं अभिनय केला आहे तो ही पहिल्याच चित्रपटात केलाय. छोट्या मोठ्या भूमिका करणारे सगळेच भन्नाट होते. सर्वात छोटा शाहीर एकदमच खतरनाक ठरला... शुभांगी सदावर्ते भन्नाट, अक्षय टाकचा राजा मयेकर भारी.. निर्मिती सावंत यांनी धमाल केलीये. वासु राणे मित्रा लव्ह यू आणि ज्याने लोकेशन शोधली त्या एकनाथ कदमच्या टिमला मनापासून धन्यवाद आणि माझ्या चित्रपटाला सुध्दा तू मदत करत जा अशी विनंती.. शाहीर साबळेंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. केदार आणि अंकुशला फाईव्ह स्टार रेटींग. नक्की बघा आपला महाराष्ट्र शाहीर"

हेही वाचा : Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडनं दिली गूड न्यूज! वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेता चौथ्यांदा होणार बाबा

महाराष्ट्र शाहीर हा चित्रपटा शाहीर साबेळ यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदेनं या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटात सनानं तिच्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावलं आहे,

Read More