Marathi News> मनोरंजन
Advertisement

Scam 1992 नंतर पहिल्यांदाच Raavan Leela मध्ये दिसला प्रतिक गांधीचा रोमँटिक अंदाज

प्रतिक गांधीचा रावण लीला ट्रेलरमध्ये रोमँटिक अंदाज... पाहा व्हिडीओ

Scam 1992 नंतर पहिल्यांदाच Raavan Leela मध्ये दिसला प्रतिक गांधीचा रोमँटिक अंदाज

मुंबई: वेबसिरीज स्कॅममधून घराघरात पोहोचत प्रसिद्ध झालेला प्रतीक गांधी आता वेगळ्या अंदाजात मोठ्या स्क्रीनवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी मात्र त्याचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास धमाकेदार पण तेवढीच रोमँटिक अशी कथा घेऊन येणार आहे. Scam 1992 वेबसीरिजनंतर आता प्रतीक गांधीचा सिनेमा लवकरच येणार आहे. 

रावण लीला (भावई) या सिनेमातून प्रतिक गांधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये प्रतिक गांधीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला आहे. त्याच्या या सिनेमाची चाहते आतूरतेनं वाट पाहात आहेत. 

रावण लीला सिनेमाच्या ट्रेलरवरून हे स्पष्ट दिसतंय की ही एक वेगळ्या धाटणीची प्रेमकथा असणार आहे. चित्रपटाची कथा ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. ही कथा गुजरातवर केंद्रित आहे, ज्यामध्ये रावण आणि सीतेची भूमिका करणाऱ्या ऐंद्रिताच्या भूमिकेत दिसलेल्या प्रतीकने रियल लाईफमध्ये रोमान्स दाखवला आहे. या सगळ्याला गावकऱ्यांचा विरोधही आहे. 

या ट्रेलरवरून तरी वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा सिनेमा 1 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार आहे. रावण लीला चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केलं. प्रतिक गांधीचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटातून तो पदार्पण करणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Read More