Marathi News> मनोरंजन
Advertisement

ओम राऊतच्या 'आदिपुरुष 2' साठी प्रभासने दिला नकार? खरं काय जाणून घ्या

Adipurush 2: ओम राऊतचा आदिपुरुषचा सिक्वेल आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, त्यामागची सत्यता काय आहे जाणून घ्या?

ओम राऊतच्या 'आदिपुरुष 2' साठी प्रभासने दिला नकार? खरं काय जाणून घ्या

Adipurush 2: ओम राऊत (Om Raut) याने दिग्दर्शित केलेला आणि प्रभास, (Prabhas) क्रिती सेनन (Kriti Sanon) व सैफ अली खानची (Saif Ali Khan) प्रमुख भूमिका असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच व्हिएफएक्स आणि कलाकारांचा लूक यावरुन नेटकऱ्यांनी सडकून टीका केली होती. तर प्रदर्शनानंतर चित्रपटातील संवादामुळं विरोध अधिक वाढला. 600 कोटी बजेट असलेला 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर जेमतेमच कलेक्शन करु शकला आहे. त्यातच आता 'आदिपुरुष' चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. पण यात अभिनेता प्रभास मात्र दिसणार नसल्याचाही दावा केला जातोय. 

ओम राऊत बाहुबलीप्रमाणेच 'आदिपुरुष'ही दोन पार्टमध्ये प्रदर्शित करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. संपूर्ण चित्रपट हा 3 तास 20 मिनिटांचा असून ओम राऊतला आणखी काही महिने 'आदिपुरुष' चित्रपटासाठी काम करायचे होते. जेणेकरुन चित्रपटाचा वेळ अजून वाढेल आणि 'बाहुबली'प्रमाणे दोन पार्टमध्ये रिलीज होऊ शकेल. मात्र, ओम राऊतच्या या निर्णयावर अभिनेता प्रभासने आक्षेप घेतला होता. दोन भागात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही, असं प्रभासचं मत होतं. त्यानंतर दिग्दर्शकाने माघार घेत हा निर्णय रद्द केला. 

ट्विट व्हायरल 

ट्विटरवर एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. यात त्या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार, 'आदिपुरुष २' साठी दिग्दर्शक ओम राऊत आग्रही होता. मात्र, प्रभासने सिक्वेलसाठी नकार दिला आहे, असं यात म्हटलं आहे. हे ट्विट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच 'आदिपुरुष'चा दुसरा पार्ट येणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. 

खरंच प्रभासने नकार दिला?

दरम्यान, अद्याप दिग्दर्शक व चित्रपटाच्या टीमकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आले नाहीये. तसंच, प्रभास आणि ओम राऊत यांच्यात खरंच असं काही संभाषण झालंय का? हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

340 कोटींचा गल्ला 

दरम्यान, 'आदिपुरुष' चित्रपटाचे संपूर्ण बजेट 600 कोटी होते. मात्र, आत्तापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भारताबाहेर चित्रपटाने 100 कोटी जमवले होते. तर भारतात दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यश आले आहे. 

चित्रपटाला विरोध कायम 

चित्रपट प्रदर्शन होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणता विरोधाचा सामना करताना दिसत आहे. चित्रपटातील संवाद तसंच, पटकथेतून देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. वाढता विरोध पाहता चित्रपटाच्या टीमने वादग्रस्त संवाद बदलले आहेत. मात्र, तरीही चित्रपटाला हवा-तितका प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाहीये. 

Read More