Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता सनी देओल बेपत्ता?; व्हायरल पोस्टरमुळे एकच खळबळ

सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर अनेक ठिकाणी लावण्यात आलेत

अभिनेता सनी देओल बेपत्ता?; व्हायरल पोस्टरमुळे एकच खळबळ

भाजप (BJP) खासदार सनी देओल (mp sunny deol) बेपत्ता झाल्याची अनेक पोस्टर्स पंजाबमधील (punjab) पठाणकोटमध्ये (pathankot) चिकटवण्यात आली आहेत. ही पोस्टर्स सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल होत आहे. खासदार झाल्यानंतर सनी देओल (mp sunny deol) कधीही गुरुदासपूरला (gurdaspur) आलेले नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक संतापले असून अभिनेता आणि खासदार सनी देओलचा निषेध करत आहेत. (Sunny Deol Missing Poster)

स्थानिक आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, ते स्वतःला पंजाबचे (punjab) पुत्र म्हणवतात, पण त्यांनी कोणतेही विकासकामे केलेली नाहीत. कोणत्याही निधीचे वाटप देखील झालेले नाही. यासोबतच केंद्र सरकारची (Central Government) कोणतीही योजना येथे आणलेली नाही. त्यांना काम करायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा रोष स्थानिकांनी व्यक्त केलाय. मात्र, याआधीही अनेकदा पठाणकोट (pathankot) आणि गुरुदासपूरमध्ये (gurdaspur) सनी देओल (mp sunny deol) बेपत्ता (Missing) झाल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

सनी देओल हे गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. अशातच खासदार बेपत्ता झाल्याचे हे पोस्टर शहरातील अनेक घरे, रेल्वे स्थानक तसेच अनेक वाहनांच्या भिंतींवर चिकटवण्यात आले आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविरोधातील नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.

Read More