Marathi News> मनोरंजन
Advertisement

Photo : मालदीवमध्ये सैफ आपल्या कुटुंबियासोबत

पाहा फोटो

Photo : मालदीवमध्ये सैफ आपल्या कुटुंबियासोबत

मुंबई : बॉलिवूडमधील कूल कपल करीना कपूर आणि सैफ अली खान सध्या मालदीवमध्ये सुट्या घालवत आहेत. करीना - सैफसोबत सोहा अली खान, कुणाल खेमू मुलगी इनाया देखील आहे. पटौदी कुटुंबियांचा हा पूल फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत तैमूर आणि त्याची बहिण इनाया देखील दिस आहेत. 

सोहा अली खानने आपल्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोत हे सहा ही जण अतिशय आनंद लुटत असल्याचं दिसत आहे. हा फोटो आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

 

Make a splash! @discoversoneva #discoversoneva #familygoals

A post shared by Soha (@sakpataudi) on

करिनाचा पूल लूक अतिशय रिफ्रेशिंग वाटत आहे. मेकअप न करता करिना अतिशय सुंदर दिसत आहे. करिना आणि सैफ अगदी स्वॅग लूकमध्ये दिसत आहेत. तैमूर हा सगळ्यांचा आवडता आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी सगळेच आतुर असतात. या पूलमध्ये तैमूर देखील दिसत आहे.

 

Wall of fame  @discoversoneva #discoversoneva

A post shared by Soha (@sakpataudi) on

करिना तैमूरच्या जन्मानंतर वीरे दी वेडिंग या सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. तर सेक्रेड गेम्समुळे सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. आपल्या कामातून थोडा वेळ काढून हे सगळेजण मालदीवमध्ये एन्जॉय करत आहेत.

Read More