Marathi News> मनोरंजन
Advertisement

इरफानच्या जाण्याने नेतेमंडळीही भावूक


इरफानच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे

इरफानच्या जाण्याने नेतेमंडळीही भावूक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानने वयाच्या 54व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याची अशी अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. इरफानने कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफानच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वासह, त्याच्या चाहत्यांमध्ये, राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे. कलाविश्वाने एक उत्तम नट, चांगला व्यक्ती गमावला असल्याची भावना व्यक्त होतेय.

पंतप्रधान मोदींनीही इरफानच्या निधनाने दु:ख व्यक्त केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. इरफान खान यांच्या निधनाने नाटक, सिनेमा जगताला मोठं नुकसान झाल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे. विविध माध्यमांमधून त्यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीबद्दल ते सदैव आठवणीत राहतील, असं म्हणत मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

अभिनेते इरफान खान काळाच्या पडद्याआड

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव अणि अनेक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी इरफानच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे. 

अभिनेता इरफान खानचा एनएसडी ते हॉलिवूडपर्यंतचा लक्षवेधी प्रवास

'इज्जत और जिल्लत आपके हाथ मे नही है'; इरफानचे निवडक उदगार वाचाच

Read More