Marathi News> मनोरंजन
Advertisement

पवनदीप आणि अरुणितामध्ये 'कुछ कुछ होता है'; पाहा दोघांची जबरदस्त केमिस्ट्री

'कुछ कुछ होता है' चित्रपटातील गाण्यावर पवनदीप आणि अरुणिताची जबरदस्त केमिस्ट्री

पवनदीप आणि अरुणितामध्ये 'कुछ कुछ होता है'; पाहा दोघांची जबरदस्त केमिस्ट्री

मुंबई : इंडियन आयडल 12 (Indian Idol 12) शो संपला जरी असला तरी स्पर्धकांची चर्चा तुफान रंगल्या आहेत. पण सर्वात जास्त चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजे अरुणिता कांजिलाल आणि पवनदीप राजन. आज देखील सोशल मीडियावर त्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. त्यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडते. आता सुद्धा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरुणिता आणि पवनदीप अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल स्टारर 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील एका रोमांटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत . 

 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील 'कोई मिल गया' गाण्यावर दोघे सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. त्यांच्या या अंदाजाने चाहत्यांचे मन जिंकलं आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशलव मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 दोघांबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची ओळख 'इंडियन आयडल' शोच्या माध्यमातून झाली. तेव्हा त्यांच्या लव्ह एन्गलची चर्चा रंगली. आता शो संपला असूनही दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Read More