Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pavitra Punia-Eijaz Khan यांनी गुपचूप उरकला साखपुरडा, सोशल मीडियावर फोटो शेअर

पवित्रा पुनिया आणि एजजा खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  

Pavitra Punia-Eijaz Khan यांनी गुपचूप उरकला साखपुरडा, सोशल मीडियावर फोटो शेअर

Pavitra Punia And Eijaz Khan Engagement: पवित्रा पुनिया आणि एजजा खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  टीव्हीचे लोकप्रिय जोडपे एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांनी साखरपुडा केला आहे. त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे. 'बिग बॉस 13' (Big Boss 13) मध्ये टीव्हीचे सर्वात आवडते कपल पवित्रा पुनिया आणि एजाज खान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. (pavitra punia and eijaz khan marriage nmp)

लवकरच अडकणार लग्नबंधनात (marriage)

पवित्राने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एंगेजमेंट (Engagement) रिंग (Ring) फ्लॉंट करताना दिसत आहे. इंस्टाग्राम स्टोरी पवित्राने कॅप्शन लिहिले- हे खरंच आहे का? अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सांगण्यासाठी पुरेसा आहे की ही तिची एंगेजमेंट रिंग आहे. पवित्राचा हा फोटो पाहून तिने आणि एजाजने गुपचूप एंगेज केल्याचे बोललं जात आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत.

हे फोटो शेअर करताना एजाज खानने लिहिलं आहे की, "बेबी, जर आपण योग्य वेळेची वाट पाहत राहिलो तर ते कधीच येणार नाही, मी तुला वचन देतो, माय बेस्ट, तू माझ्याशी लग्न करशील का? ती 'हो' म्हणाली. " एजाजच्या या पोस्टवर पवित्राने कमेंटमध्ये लिहिले की, “देव आम्हाला वाईट नजरेपासून वाचवो. फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम असू द्या." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eijaz Khan (@eijazkhan)

या पोस्टनंतर सेलेब्स (Celebs) आणि फॅन्स (fans) या दोघांना एंगेजमेंटबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 

Read More