Marathi News> मनोरंजन
Advertisement

लहानशा भूमिकेतही गाजली 'पंचायत 3'ची 'ही' अभिनेत्री; कास्टींग काऊचचा तो अनुभव सांगताना आजही आठवतो संघर्ष...

Panchayat 3 : 'पंचायत 3' या सीरिजनं प्रदर्शित झाल्या क्षणापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सीरिजच्या पहिल्या पर्वाला जितकं प्रेम मिळालं त्यात यावेळी आणखी भर पडली.   

लहानशा भूमिकेतही गाजली 'पंचायत 3'ची 'ही' अभिनेत्री; कास्टींग काऊचचा तो अनुभव सांगताना आजही आठवतो संघर्ष...
Updated: Jun 18, 2024, 11:08 AM IST

Panchayat 3 : 'पंचायत 3' च्या निमित्तानं या सीरिजच्या नव्या पर्वातून एक नवं कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. कथानकात काही पात्र नव्यानं पाहायला मिळाली, तर काही पात्र मात्र जुनी असली तरीही त्यांना या पर्वामध्ये मिळाललेा वाव प्रेक्षकपसंती मिळवून गेला. 'पंचायत 3'मधील मध्यवर्ती भूमिकांप्रमाणं, लहान भूमिका साकारणाऱ्या कलाकारंचंही चाहत्यांनी कौतुक केलं. त्यातलंच एक पात्र म्हणजे 'पंचायत'मधील 'रिंकी'च्या मैत्रिणीचं अर्थात 'रवीना'चं. 

यापूर्वीच्या पर्वात फारशी प्रसिद्धी मिळाली नसली तरीही, यंदाच्या पर्वात मात्र रवीना साकारणाऱ्या अभिनेत्री आंचल तिवारीनं आपल्याला कमाल प्रसिद्धी मिळाल्याचं एका वृत्तसमुहाशी संवाद साधताना म्हटलं. यावेळी आपल्या निधनाच्या अफवांपासून Compromise पर्यंतच्या प्रसंगांपर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा तिनं केला. 

कधीच ऐकला नव्हता Compromise हा शब्द... 

कलाजगतामध्ये प्रवेश केल्यानंतर एखाद्याच्या वाट्याला चांगलेच अनुभव येतील अशातली बाब नाही आणि याच वस्तुस्थितीचा सामना आंचललासुद्धा करावा लागला. एका मालिकेच्या निमित्तानं काम करणाऱ्या आंचलला कॉम्प्रोमाईज अर्थात तडजोड करण्यास सांगण्यात आलं. 'मी याआधी हा शब्दही ऐकला नव्हता. त्यावेळी मला खुप वाईट वाटलं. प्रचंड रडूही आलं. कलाजगतातील वाट बिकट होती. कारण, मला अनेकदा अपमानही सहन करावा लागला, बऱ्याचदा तर, आपण चुकिच्या क्षेत्राची निवड केली असंही वाटलं', या शब्दांत आंचलनं या क्षेत्रातील तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : भारतातील हिमवाळवंटात अमेरिकन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू; कडेकपारीतून मृतदेह काढताना ITBP ची दमछाक

देवाच्या कृपेनं आपल्या वाटेत जितक्या अडचणी आल्या त्या सर्व अडचणींवर मात करत आली आणि यामध्ये नशीबाचीही तितकीच साथ मिळाली, असं सांगत आंचलनं तिच्या संघर्षाची कहाणी सर्वांसमोर आणली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anchal Tiwari (@anchalt555)

निधनाच्या अफवा कानावर आल्या आणि... 

भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारीचं निधन झालं तेव्हा अनेकांनीच या आंचलचं निधन झाल्याचं समजत तशाच चर्चा सुरु केल्या. अनेक माध्यमांनी तर, चुकिच्या आंचलचे फोटोही लावले. त्याचदरम्यान, पंचायतमधील फैजल यांनी संपर्क साधत टीम आंचलला श्रद्धांजली देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं. तेव्हा तिच्या कुटुंबात इतका तणाव निर्माण झाला की, एका चुकिमुळं अनेकांना त्रास होताना पाहून आंचलनं संतापाच्या भरात एक व्हिडीओ पोस्ट करत सत्य सर्वांसमोर आणलं. प्रसिद्धीसाठी आपण हे केलं, असं म्हणणाऱ्यांना आंचलनं त्यावेळी सडेतोड उत्तर दिलं होतं.