Marathi News> मनोरंजन
Advertisement

'कंगनाच्या कानशिलात लगावेन...', पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

Kangana Ranaut Pakistani actress : कंगना रणौत लवकरच 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्या आधी कंगना चर्चेत येण्याचं कारण हे पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 

'कंगनाच्या कानशिलात लगावेन...', पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

Kangana Ranaut Pakistani actress : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या 'चंद्रमुखी -2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या लूकची चांगलीच चर्चा सुरु आहे. या सगळ्यात आता पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नौशीननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनाला भेटून तिला कानशिलात लगावण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. 

नौशीननं एका टॉक शोमध्ये बोलताना सगळ्या हद्द पार केल्या आहेत. यावेळी त्यांनी म्हटलं की कंगनाला भेटायची तिची इच्छा आहे. त्याविषयी पुढे सांगत नौशीत म्हणाली की 'ज्या प्रकारे ती माझ्या देशाविषयी वाटेल ते बोलते, ज्या प्रकारे ती पाकिस्तानी सेनेविषयी काहीही बोलते. तिच्यात असलेल्या हिंमत्तीची दाद द्यायला हवी. तिला अक्कल नाही आहे पण तिला देशाविषयी बोलायचे आहे. ती देखील दुसऱ्या देशाची आहे. स्वत: च्या देशावर लक्ष द्या. तिच्या अभिनयावर लक्ष द्यायला हवे. तिच्या कॉन्ट्रॉवर्सी आणि एक्स लव्हर्स आणि इतर गोष्टींकडे लक्ष दे.'

पुढे कंगनाच्या बुद्धीविषयी बोलताना नौशीन म्हणाली की 'तुला कसं माहित की पाकिस्तानमध्ये लोकांना चांगली वागणूक देण्यात येते? तुला पाकिस्तानी सेनेविषयी कसं माहिती आहे? तुला आमच्या एजंसीविषयी कसं माहित आहे? आम्हाला स्वत: ला माहित नाही, एजंसी आमच्या देशात आहे, सेना आमच्या देशात आहे कारण ते लोक अशा गोष्टी आम्हाला सांगत नाही... हे सीक्रेट आहे असं वाटत नाही का?'

अखेर कंगनाची स्तुकी करत ती म्हणाली की अप्रतिम अभिनेत्री,  सुंदर , खूप सुंदर स्त्री... पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं की जेव्हा इतर लोकांचा आणि देशांचा आदर करण्याचा विचार येतो तेव्हा तो खूप वाईट आहे...तो एक अतिरेकी आहे.

हेही वाचा : शाहरुखचा Jawan पाहताना थिएटरमध्ये गर्लफ्रेंडसोबत केलं असं कृत्य... व्हिडीओ झाला व्हायरल...

दरम्यान, मंगळवार 5 सप्टेंबर रोजी कंगना रणौतनं तिच्या ट्विटरवर भारत हे नाव इंडियापेक्षा चांगले का आहे असं म्हणतं एक पोस्ट शेअर केली होती. कंगनाच्या कामा विषयी बोलयाचे झाले तर तिला चंद्रमुखीच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशात आता चंद्रमुखी हा चित्रपट गणेश चतुर्थीनिमित्तानं प्रदर्शित होणार आहे.

Read More