Marathi News> मनोरंजन
Advertisement

'लोकांना वाटायचं मी नशा करते पण, तपासणीनंतर... 'अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार

जगात असे अनेक आजार आहेत ज्यांमुळे आपल्याला आपल्या कामातही अडथळा आहे असं वाटतं. पण जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांनी आपल्या गंभीर आजारावर मात करत जगात मोठं यश प्राप्त केलं आहे. 

'लोकांना वाटायचं मी नशा करते पण, तपासणीनंतर... 'अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार

Iman Ali on multiple sclerosis: जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकजण आपल्या अडचणीवर मात करत असतात. त्याच वेळी, काही लोक जगाला आपलं सामर्थ्य काय हे त्यांच्या कृतीतून दाखवून देतात.  पाकिस्तानी अभिनेत्री इमान अली (Actress Iman Ali multiple sclerosis) देखील याच काही व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. इमान पाकिस्तानातील सुंदर आणि टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अतिशय तंदुरुस्त आणि सुरेख दिसणाऱ्या इमानला एका मोठ्या आजाराने ग्रासले आहे, परंतु तिनं ते कधीही लोकांसमोर आणू दिलं नाही. या आजाराशी लढताना इमान टॉप अभिनेत्री कशी बनली ते जाणून घेऊया. (Pak actress Iman Ali revealed her battle against living with multiple sclerosis)

41 वर्षीय इमान अलीने 'खुदा के लिए' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाने तिला एक ओळख दिली. 'खुदा के लिए' हा चित्रपट इमानच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक ठरला. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीसोबत मोठा अपघात झाला. किंबहुना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला दिसणं बंद झालं होतं. एका मुलाखतीदरम्यान तिनं या घटनेचा उल्लेखही केला आहे.

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पहिलाच चित्रपट, मोठा ब्रेक आणि अभिनेत्रीने ज्याची कल्पनाही केली नव्हती ते घडले. चेकअपनंतर असे आढळून आले की इमानला मल्टीपल स्क्लेरोसिस (multiple sclerosis) नावाचा आजार आहे. या आजारात व्यक्तीला एका बाजूनं दिसणं बंद होतं. शरीर ओलसर होते. (multiple sclerosis symptoms) पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवतो. 'खुदा के लिए'च्या शूटिंगदरम्यान जेव्हा इमानला मल्टीपल स्क्लेरोसिस झाल्याचे कळले, तेव्हा तिच्यासाठी हा मोठा धक्का होता.

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

या आजाराबद्दल कळल्यानंतर इमान अलीला नक्कीच भीती वाटली. पण ती थांबली नाही आणि तिने संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. आजारपणात इमान अलीने आपल्या चित्रपट कारकिर्दीत उंच भरारी घेतली. इतकंच नाही तर इमानला लहानपणापासूनच नाकाचा (नासाचा आजार) आहे. यामुळे तिचे तोंड कधीच पूर्णपणे (multiple sclerosis treatment) बंद होत नाही. तिची बोलण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. त्यामुळे अनेकदा लोकांना तिनं नशा केली आहे असे जाणवते. पण अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितले की ती नशा करत नाही, पण तिला नाकाचा त्रास आहे.

इमान अली म्हणते की, तिच्या आजार आणि त्रासांमुळे (what is multiple sclerosis) ती केवळ टॉपची अभिनेत्री बनली नाही तर तिने लग्नही केले. इमान तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक (multiple sclerosis meaning) आयुष्यात खूप आनंदी आहे. 19 ऑक्टोबर रोजी इमान अलीचा आगामी चित्रपट टिच बटनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज होताच लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आता बघूया चित्रपट कशामुळे हिट होतो. (multiple sclerosis causes) 

Read More