Marathi News> मनोरंजन
Advertisement

३०० हून अधिक कट्सनंतर रिलीज होणार 'पद्मावत'

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा चित्रपट अखेर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

३०० हून अधिक कट्सनंतर रिलीज होणार 'पद्मावत'

मुंबई: संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा चित्रपट अखेर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

चित्रपटामध्ये काही बदल, नावामध्ये बदल आणि काही अटींवर हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

चित्रपटात ५ बदल/ ३०० हून अधिक कट्स

करणी सेनेप्रमाणे अनेक संघटनांनी चित्रपटाला विरोध दर्शवला होता. या विरोधासमोर नमते घेत पद्मावती हा चित्रपट आता 'पद्मावत' या नावाने रिलीज होणार आहे. 

'पद्मावत' रिलीज करण्यासाठी ५ बदल सुचवण्यात आले आहेत. मात्र या बदलांसाठी चित्रपटाला ३०० हून अधिक कट्स लागण्याची शक्यता आहे. सेन्सॉर बोर्डाच्या ५ बदलांचा चित्रपटावरपरिणाम होणार आहे.  

ना 'मेवाड' ना 'दिल्ली' 

मुंबई मिररच्या माहितीनुसार, या चित्रपटामध्ये जेथे दिल्ली, चित्तोड, मेवाड यांचा समावेश करण्यात होता त्याला पूर्णपणे हटवले जाणार आहे. त्यामुळे दर्शकांना चित्रपट पाहताना कुठल्या गोष्टीबाबत सीन चालू आहे. हे समजण कठीण होणार आहे. 

'पद्मावत' काल्पनिक कहाणी 

'पद्मावत' हा सिनेमा एक काल्पनिक कहाणीच्या स्वरूपात दाखवली जाणार आहे. दीपिका, शाहीद आणि रणवीर यांची ऐतिहासिक पात्र आहेत. परंतू चित्रपटामध्ये मात्र त्यांना काल्पनिक असल्याचं दाखवलं जाणार आहे. तसा डिसक्लेमर दिला जाईल.  चित्रपटामध्ये बदल करूनही त्याला करणी सेनेचा विरोध कायम आहे.  

Read More