Marathi News> मनोरंजन
Advertisement

कधीकाळी चिकन विकणारा 'हा' चिमुकला, आज गाजवतोय बॉलिवूड; आहे 'इतक्या' कोटींचा मालक

Guess the Actor :  कधीकाळी चिकन विकणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का? 

कधीकाळी चिकन विकणारा 'हा' चिमुकला, आज गाजवतोय बॉलिवूड; आहे 'इतक्या' कोटींचा मालक
Updated: Jul 06, 2024, 08:42 AM IST

Guess the Actor : आपल्या मजेशीर स्वभाव आणि हटके फॅशनमुळे लोकप्रिय असलेला अभिनेता कोण? असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपल्या सगळ्यांच्या तोंडात एकाचंच नाव येतं आणि तो म्हणजे रणवीर सिंग. रणवीर कोणतीही भूमिका साकारताना त्यासाठी खूप कष्ट घेतो आणि ते पडद्यावर दिसून येतं. 'बॅन्ड बाजा बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा रणवीर सिंगचे लाखो चाहते आहेत. कधी पडद्यावर तो आपल्याला एका लव्हरच्या भूमिकेत दिसतो. कधी एकदम सिरीयस, तर कधी खलनायकाच्या भूमिकेत दिसतो. तर कधी कॉमिक भूमिकेत. त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आज याच रणवीर सिंगचा 39 वा वाढदिवस आहे आणि लवकरच तो वडील होणार आहे.

लोकप्रिय अभिनेत्रीचा नातू 

रणवीर सिंगची जेव्हा केव्हा बोललं जातं तेव्हा तो फिल्मी बॅकग्राऊंडचा असल्याचे मानले जाते. पण त्याचं चित्रपटसृष्टीशी देखील एक खास कनेक्शन हे होतंच. रणवीरचं नात 50 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक चांद बर्क यांचा नातू आहे. या त्याच चांद बर्क आहेत ज्यांना राज कपूर यांनी चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. रणवीरचे वडील जगजीत सिंग भवनानी हे चित्रपटसृष्टीपासून लांब असले तर रणवीर सिंगनं त्याच्या आजीच्या मार्गावर जायचं ठरवलं. चांद बर्क यांनी वयाच्या 14 व्या वर्षी पंजाबी चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रणवीरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की कॉलेजच्या काळात तो पार्ट टाइम नोकरी करत होता. त्यावेळी तो बटर चिकन विकायचा आणि त्याशिवाय तो बनवायचा सुद्धा. 

किती कोटींच्या संपत्तीचा मालक आहे रणवीर सिंग?

रणवीर एका चित्रपटासाठी जवळपास 20 कोटी मानधन घेतो. तर ब्रॅन्ड एन्डॉर्समेंट, पाहुण्या कलाकाराची भूमिका आणि जाहिरातींसाठी दर महिन्याला 2 कोटींपेक्षा जास्त मानधन घेतो. रणवीर आणि दीपिका यांचं मुंबईत आलिशान घर आहे. ज्या घराची किंमत ही 22 कोटी आहे. हा एक 5BHK फ्लॅट आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे अलीबागमध्ये एक बंगला आहे. 

हेही वाचा : T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर घरी पोहोचला हार्दिक पांड्या, पत्नी नताशा नाही तर 'या' व्यक्तीनं केलं ग्रॅंड वेलकम

कार कलेक्शन

रणवीरच्या कार कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर त्याच्याकडे 1.8 कोटींची मर्सिडीज मेबॅक एस 500 आहे. त्याशिवाय त्याच्याकडे लॅम्बॉरगिनी उरूस असून त्याची किंमत ही 3 कोटी आहे. त्यानंतर त्याच्याकडे 3.2 कोटींची एस्टन मार्टिन रॅपिड आणि याशिवाय आणखी बऱ्याच गाड्या आहेत. तर रणवीरला लुटेराच्या निर्मात्यांनी 7 लाख रुपयांची एरियल विंटेज मोटरसायकल गिफ्ट केली होती. कारण त्यानं चित्रपटात ती बाईक चालवली होती आणि त्याला ती फार चालवली होती. रणवीरच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचे झाले तर ती एकूण $44 मिलियन म्हणजेच 334 कोटींपर्यंत आहे.