Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानच्या वाढदिवसाला नवी घोषणा

सलमान खानचा नुकताच 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रदर्शित झाला. आणि 

सलमान खानच्या वाढदिवसाला नवी घोषणा

मुंबई : सलमान खानचा नुकताच 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रदर्शित झाला. आणि 

सलमान खानच्या या सिनेमाने सगळे विक्रम मोडले आहेत. 150 कोटीचा गल्ला या सिनेमातून सलमानने कमावला आहे. तसेच सलमान आता आपल्या रेस 3 या सिनेमाचं शुटिंग करत आहे. मात्र आता सलमानच्या वाढदिवसादिवशी एक नवी घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्य व्यक्त करू नका, ही घोषणा काय सलमानच्या लग्नाची नाही. तर ही घोषणा आहे सलमान खानच्या 

आगामी सिनेमाची. सलमान खानचा पुढचा सिनमा भारत हा ईदच्या दिवशी प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी सिरीजने घोषणा केली आहे की, सलमान खानचा हा सिनेमा अतुल अग्निहोत्री आणि भूषण कुमार असे एकत्र हा सिनेमा तयार करत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. 

दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खानचा एकतरी सिनेमा प्रदर्शित होतो. त्यामुळे 2019 च्या ईदला भारत हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 

Read More