Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुशांत सिंहचा उल्लेख करत विकी जैनकडून पत्नी अंकितावर गंभीर आरोप

Vicky Jain talked about Sushant Singh Rajput : विकी जैननं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा उल्लेख करत अंकिता लोखंडेवर केला आरोप... 

सुशांत सिंहचा उल्लेख करत विकी जैनकडून पत्नी अंकितावर गंभीर आरोप

Vicky Jain talked about Sushant Singh Rajput : 'बिग बॉस 17' चा फिनाले जवळ आला आहे आणि बिग बॉसच्या घरातील भांडण संपण्याचं नाव घेत नाही आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडण होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. शोमध्ये अनेकदा अंकितानं दिवंगत अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूरचा उल्लेख केला आहे. पण आता पहिल्यांदा असं झालं की विकी जैननं अंकितासोबत भांडणात सुशांतचा उल्लेख केला आहे. विकी म्हणाला की सुशांतच्या निधनानंतर तो तिच्यासोबत होता. 

काय होतं संपूर्ण प्रकरण?

शोमध्ये अंकिता आणि विकी भांडत होते. विकी त्याच्या आईला डिफेंड करत होता. त्यादरम्यान, त्यानं अंकिताला तिच्या वाईट काळात त्यानं सांभाळलं असं त्यानं म्हटलं. विकीनं अंकिताला म्हणाला की 'सुशांतच्या निधनानंतर सगळं सांभाळणं खूप कठीण झालं होतं. मी तुझ्यासोबत होतो. मी तुला कधीच त्याच्याविषयी बोलताना अडवलं नाही. तुला मुलाखत द्यायची होती आणि मी तुला त्यात मदत केली. तुला मुलाखतीत काय सांगायला हवं आणि सोशल मीडियावर काय लिहायला हवं, सगळं काही सांगितलं. मी नेहमीच तुझ्यासोबत उभा होतो. मी कधीच कोणाला तुझ्यावर प्रश्न उपस्थित करू दिले नाही. मात्र, मी काही केलं तरी तू लगेच सगळ्या गोष्टीला रिअॅक्ट करत असते.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं देखील अंकिताला पाठिंबा दिला होता. सुशांतचा उल्लेख केल्यानंतर अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. श्वेतानं सुशांत आणि अंकिताचे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं होतं की आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो अंकी. तू बेस्ट आणि खूप गोड आहेस. 

कशी झाली होती सुशांत आणि अंकिताची भेट

सुशांत आणि अंकिताच्या भेटीविषयी बोलायचे झाले तर त्या दोघांची पहिली भेट ही छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिके दरम्यान, दोघं एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अंकिता आणि सुशांतचा काही कारणांमुळे ब्रेकअप झाला. जून 2020 मध्ये निधन झालं. त्यानंतर अंकितानं डिसेंबर 2021 मध्ये विकी जैनशी लग्न केलं. 

Read More