Marathi News> मनोरंजन
Advertisement

मनी लाँडरिंगप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; नोरा फतेहीनं जॅकलिन फर्नांडिसविरोधात ठोकला अब्रुनूकसानीचा दावा

आता या सगळ्या प्रकरणानंतर नोराने तिचा नवा डाव मांडला आहे. नो

मनी लाँडरिंगप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट;  नोरा फतेहीनं जॅकलिन फर्नांडिसविरोधात ठोकला अब्रुनूकसानीचा दावा

मुंबई : जिथे बॉलिवूडमध्ये मैत्री पक्की होते तिथेच त्यांच्यात शत्रुत्वही असतं. आता तुम्ही म्हणाल आम्ही कोण बद्दल बोलतोय.  तर, आम्ही बोलतोय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्याबद्दल. या दोघी एकाच व्यक्तीमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकल्या. या दोघींवर तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि या दोघी ज्या कॉमनमॅनमुळे अडकल्या आहेत तो दुसरा तिसरा कोणी नसून सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) आहे. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल सांगणार आहोत.

आता या सगळ्या प्रकरणानंतर नोराने तिचा नवा डाव मांडला आहे. नोराने जॅकलिन फर्नांडिस विरोधात गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. जॅकलीन फर्नांडिस ही या खटल्यात गुन्हेगार असली तरी नोरा ही या प्रकरणात एक गुन्हेगार आहे. सुकेशमुळे सध्या दोन्ही अभिनेत्री चांगल्याच फसल्याचं दिसत आहे.

200 कोटींच्या मनी लाँडरिंगप्रकरणी एक वेगळाच ट्विस्ट पाहायाल मिळतोय. अभिनेत्री नोरा फतेहीनं जॅकलिन फर्नांडिसविरोधात 200 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय. जॅकलीननं ईडीला दिलेल्या जबानीत खोटी बदनामीकारक जबाब नोंदवल्याचा दावा नोरा फतेहीनं केलाय. नोरा आणि जॅकलीन यांची सातत्यानं ईडीकडून या मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी करण्यात आलीय.

नोराचा जॅकलिनवर दावा
नोराने आपल्या तक्रारीत असा दावा केला आहे की, नोराच्या नावाचा वापर केवळ तिची प्रतिमा डागाळण्यासाठी केला जात आहे. तिने नेहमीच सर्वांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नोराने नवी दिल्लीच्या पटियाला कोर्टात जॅकलिनविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

 अनेकदा जॅकलिन या प्रकरणा संबधात पटियाला कोर्टात हजर असल्याचं आपण पाहिलं आहे. हे प्रकरण २० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलं आहे. सुकेशच्या २०० करोडच्या स्कॅम प्रकरणात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाहीये. 

Read More