Marathi News> मनोरंजन
Advertisement

हाय हिल्समध्ये Nora Fatehiचा हॉट डान्स

नृत्य कौशल्याच्या आधारावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान प्रस्थपित केलं आहे. 

हाय हिल्समध्ये Nora Fatehiचा हॉट डान्स

मुंबई : मोरोक्कनची सुंदरा अभिनेत्री नोरा फतेहीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसत आहे. 'दिलबर' गाण्यातील तिच्या नृत्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री म्हणून आपली ओळख प्रस्थापित करणारी नोरा फतेहीने तिच्या अभिनयाने आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. नेराचा  'साकी-साकी' डान्स आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. पुन्हा नोराने त्याचं गाण्यावर स्वतःची जादू दाखवली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केले आहे. या व्हीडिओमध्ये नोरा कोरियोग्राफर तुषार कालिया डान्स करताना दिसत आहे. व्हीडिओ पेस्ट करत नोराने कॅप्शनमध्ये, 'ड्रेस आणि हाय हिल्समध्ये डान्स करणं एका वाईट स्वप्ना सारखं आहे.' असं लिहिलं हा व्हीडिओ डान्स दिवानेच्या सेटवरचा आहे. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर नोरा फतेही लवकरच अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे. नोराने अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या आधारावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान प्रस्थपित केलं आहे. 

Read More